News Flash

“फक्त आकडे….तिकडे मृत्युंचे तर इकडे जागांचे!” – स्वानंद किरकिरे यांचं ट्विट चर्चेत

वाढत्या मृत्युंवर केली खंत व्यक्त

“फक्त आकडे….तिकडे मृत्युंचे तर इकडे जागांचे!” – स्वानंद किरकिरे यांचं ट्विट चर्चेत

देशात आज पाच राज्यांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर होणार आहेत. सध्या मतमोजणी सुरु आहे. याच संदर्भात गायक स्वानंद किरकिरे यांनी एक ट्विट केलं आहे. हे ट्विट मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. अनेकांनी हे ट्विट रिट्विटही केलं आहे.

आपल्या ट्विटमध्ये स्वानंद म्हणतात, “फक्त आकडे..तिकडे मृत्युंचे तर इकडे जागांचे! रोज लाजेने मान खाली घालत लढणाऱ्या डॉक्टर,नर्सेसचेही आकडे कुठेतरी असतीलच!”

त्यांच्या या ट्विटवर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. संगीतकार, गायक विशाल दादलानीनेही त्यांचं हे ट्विट रिट्विट केलं आहे. त्यावर एक युजर म्हणतो, ज्यांना लाज वाटायला हवी ते तर आता आमदार खरेदी करत आहेत.

आणखी वाचा- West Bengal Election 2021 Result Live Updates: ममतांचे द्विशतक, तर भाजपाची १०० पार करतानाही दमछाक

पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसाम आणि पुद्दुचेरी या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल आज लागणार आहेत. देशभरात एकीकडे करोनाचं मोठं संकट सुरू असताना राजकीय वर्तुळात आज या निकालांची चर्चा आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 2, 2021 1:10 pm

Web Title: swanand kirkire tweete about election and death in india vsk 98
Next Stories
1 “ऑक्सिजन नाहीये, मन की बात लावू का?”; शत्रुघ्न सिन्हा यांचा सरकारला टोला
2 महाराष्ट्राच्या मदतीला धावली देशाची ‘गानकोकिळा’ ; मुख्यमंत्री म्हणाले, “धन्यवाद!”
3 “येणार तर ईव्हीएमच!”……. कुणाल कामराचं भन्नाट ट्विट
Just Now!
X