01 March 2021

News Flash

Video: ‘बागेत बाग राणीची बाग…’, स्वप्नालीने घेतला आस्तादसाठी खास उखाणा

त्यांनी १४ फेब्रुवारी रोजी लग्न केले आहे.

अभिनेता सिद्धार्थ चांदेकर पाठोपाठ अभिनेता आस्ताद काळे लग्न बंधनात अडकला आहे. त्याने अभिनेत्री स्वप्नाली पाटीलशी १४ फेब्रुवारी रोजी लग्न केले. काही दिवसांपूर्वी त्याच्या केळवणाचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते. आता त्यांच्या लग्नाताली एक व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आहे. या व्हिडीओमध्ये स्वप्नालीने उखाणा घेतला आहे.

आस्ताद आणि स्वप्नालीने १४ फेब्रुवारी म्हणजेच व्हॅलेंटाईन डेच्या मुहूर्तावर रजिस्टर पद्धतीने लग्न केले. त्यांच्या लग्नातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. मराठी चित्रपटसृष्टीमधील काही कलाकारांनी त्यांच्या लग्नाला देखील उपस्थिती लावली. दरम्यान, स्वप्नालीने लग्नात घेतलेल्या उखाण्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

सेलिब्रिटी प्रोमोटर्सने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर स्वप्नालीने लग्नात घेतलेल्या उखाण्याचा व्हिडीओ शेअर केला आहे. ‘बागेत बाग राणीची बाग, आस्तादचा राग म्हणजे धगधगती आग’ असा हटके उखाणा स्वप्नालीने घेतला. तिचा उखाणा ऐकून तेथे उपस्थित असलेल्या पाहुण्यांना हसू अनावर होते.

गेल्या काही वर्षांपासून आस्ताद आणि स्वप्नाली एकमेकांना डेट करत आहेत. अनेकदा त्यांनी सोशल मीडियावर एकमेकांसोतचे फोटो शेअर करुन प्रेमाची जाहीर कबुलीदेखील दिली होती. अखेर ही जोडी १४ फेब्रुवारी रोजी विवाहबंधनात अडकली. सध्या स्वप्नाली स्वराज्यजननी जिजामाता या मालिकेत झळकत आहे. तर आस्ताद चंद्र आहे साक्षीला या मालिकेत काम करत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 15, 2021 10:33 am

Web Title: swapnalee patil ukhana for aastad kale marriage photos video avb 95
Next Stories
1 “हे रोमॅन्टीक गाणं असलं तरी…”, म्हणत अमृता यांनी शेअर केलं व्हॅलेंटाइन डे स्पेशल गाणं
2 बॉलिवूड अभिनेता सचिन जोशीला ईडीकडून अटक
3 “हा फोटो खास नाही, पण…; अनुष्कानं ‘व्हॅलेंटाईन’निमित्ताने पोस्ट केला विराटसोबतचा क्षण
Just Now!
X