News Flash

स्वप्निल जोशी झाला व्यसनाधीन?

स्वप्निल सध्या 'फुगे' या त्याच्या आगामी सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे

स्वप्निल जोशीच्या प्रेमात आतापर्यंत अनेक मुली असतील. यात नवीन असं काहीच नाही. पण सध्या खुद्द स्वप्निलच प्रेमात पडला आहे. त्याचे हे प्रेम त्याच्या बायकोवर किंवा मुलीवरही नाही तर भलत्याच गोष्टीवर आहे. आता मात्र तुमच्या डोक्यात ती गोष्ट कोणती असा प्रश्न येत असेल ना? पण सध्या तो प्रेमात पडलाय तो कोणत्या व्यक्तिच्या नाही तर चहाच्या. त्याला चहा प्यायला फार आवडते. त्याला चहाचे व्यसनच आहे असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. कारण त्याला चहाचे व्यसन असल्याचे त्याने स्वतःच फेसबुक या सोशल नेटवर्किंग साइट्सवर मान्य केले आहे. तो चहाप्रेमी असल्याने नुकताच माटुंग्याच्या रामाश्रय हॉटेलमध्ये चहा प्यायला गेला होता. तेथील चहा अतिशय टेस्टी असल्याचेदेखील त्याने त्याच्या फेसबुकवरील पोस्टमध्ये म्हटले आहे.

स्वप्निल सध्या ‘फुगे’ या त्याच्या आगामी सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. या सिनेमात सुबोध भावे त्याच्यासोबत प्रमुख भूमिकेत आहे. सुबोध आणि स्वप्निल यांची अनेक वर्षांपासून मैत्री आहे. एक कलाकार म्हणूनही त्या दोघांना एकमेकांचा अभिनय खूप आवडतो. त्यामुळे त्या दोघांनाही एकत्र काम करण्याची इच्छा होती. खरे तर ते दोघे याआधीच एकत्र सिनेमा करणार होते. पण काही कारणास्तव हा सिनेमा होऊ शकला नव्हता. त्यामुळे त्यांनी एकदा व्यायाम करत असताना आपण आता एकत्र सिनेमा करुयाच असे ठरवले आणि त्या दोघांनी ‘फुगे’ करण्याचे ठरवले. त्यामुळे या दोघांसाठीदेखील हा सिनेमा खूप खास आहे. सध्या स्वप्निल या सिनेमाचे प्रमोशन करण्यात फार व्यग्र आहे. पण त्यातही तो वेळात वेळ काढून त्याने माटुंग्यातील हॉटेलमध्ये जाऊन चहाचा आस्वाद घेतला.

Happiness…before and after! #Ramashray#foodporn#mumbai #culture#teaaddict

A photo posted by Swwapnil BHAVE (@swwapnil_joshi) on

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 26, 2016 4:59 pm

Web Title: swapnil joshi addicted to tea
Next Stories
1 सामान्यांना ‘ऐ दिल है….’ पाहणे ‘मुश्किल’?
2 VIDEO: जेव्हा प्रियांका चोप्रा ‘अॅलेन डिजेनेर्स’च्या कार्यक्रमात टकीला शॉट मारते..
3 ‘ऐ दिल है मुश्किल’ आणि ‘शिवाय’ला पाकिस्तानमध्ये बंदी
Just Now!
X