बॉलिवूड कलाकार किती मानधन घेतात याबाबत तर आपण वरचेवर वाचत असतो. पण आपले आवडते मराठी कलाकार किती मानधन घेतात ते फार कमी जणांना माहित असेल. त्यामुळेच मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीचे आणि तुमचे आवडते कलाकार त्यांच्या प्रत्येक चित्रपटासाठी किती मानधन घेतात ते आपण जाणून घेणार आहोत.

मराठी चित्रपटसृष्टीतील चॉकलेट बॉय असलेला स्वप्निल जोशी हा सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता आहे. स्वप्निल त्याच्या प्रत्येक चित्रपटासाठी अंदाजे ४५-५० लाख रुपये मानधन घेतो.

मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री असलेली सई ताम्हणकर ही अभिनेत्रींमध्ये मानधनाच्या बाबतीतही आघाडीवर आहे. सई तिच्या प्रत्येक चित्रपटासाठी अंदाजे १५-२० लाख रुपये मानधन घेते.

स्वप्निलपाठोपाठ सर्वाधिक मानधन घेणा-यांमध्ये अंकुश चौधरीचा नंबर लागतो. अंकुश त्याच्या प्रत्येक चित्रपटासाठी अंदाजे २५-३० लाख रुपये मानधन घेतो.

सुबोध भावे प्रत्येक चित्रपटासाठी अंदाजे १० लाख रुपयांवर मानधन घेतो.

वाचा : ..या आहेत जान्हवीच्या भावी नवऱ्याबद्दलच्या अपेक्षा

सचित पाटील प्रत्येक चित्रपटासाठी अंदाजे १० लाख रुपयांवर मानधन घेतो.

सोनाली कुलकर्णी प्रत्येक चित्रपटासाठी अंदाजे १५-१८ लाख रुपये मानधन घेते.

अमृता खानविलकर प्रत्येक चित्रटासाठी अंदाजे १० लाख रुपयांवर मानधन घेते.

प्रिया बापट प्रत्येक चित्रटासाठी अंदाजे ८-९ लाख रुपयांवर मानधन घेते.

गश्मीर महाजनी प्रत्येक चित्रपटासाठी अंदाजे ९- १० लाख रुपयांवर मानधन घेतो.

वाचा : ..म्हणून आयशाने दिला बिकिनी सीनला नकार

उर्मिला कानेटकर -कोठारे प्रत्येक चित्रटासाठी अंदाजे ६-७ लाख रुपयांवर मानधन घेते.

उमेश कामत प्रत्येक चित्रपटासाठी अंदाजे १०-११ लाख रुपयांवर मानधन घेतो.

सोनाली कुलकर्णी प्रत्येक चित्रटासाठी अंदाजे १०-१२ लाख रुपयांवर मानधन घेते.

नेहा महाजन प्रत्येक चित्रटासाठी अंदाजे ३.५-४ लाख रुपयांवर मानधन घेते.

अनिकेत विश्वासराव प्रत्येक चित्रटासाठी अंदाजे १०-१२ लाख रुपयांवर मानधन घेतो.