News Flash

ओळखा पाहू कोण आहे हा चिमुकला?, सर्वांचा फेव्हरेट चॉकलेट हिरो

'कुश' आणि 'कृष्णा'ची साकारली आहे भूमिका

फोटोत दिसणारा हा चिमुकला आज अनेकांच्या मनावर राज्य करतोय. नऊ वर्षांचा असतानाच याने त्याच्या अभिनयाची छाप सोडली. तर खट्याळ कृष्णाच्या रुपात त्याला अवघ्या देशवासियांनी आपलंसं केलं. आलं का तुमच्या लक्षात कोण आहे हा ?

अनेक हिंदी मालिकांमधून याने वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. तर मराठी टेलिव्हिजन आणि सिनेमांमधून त्याने अनेक तरुणींना भुरळ घातली. चॉकलेट बॉय आणि रोमॅण्टिक हिरो अशी त्याची खरं तर खास ओळख आहे. तर हा चिमुकला आहे सर्वांचा लाडका स्वप्निल जोशी. स्वप्निलने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर बालपणीचा त्याचा हा फोटो नुकताच शेअर केलाय. या फोटोत स्वप्निल कमरेवर हात ठेवून उभा असल्याचं दिसतंय.

(photo-instagram@swapniljoshi)

स्वप्निलने शेअर केलेल्या त्याच्या बालपणीच्या फोटोला अनेक मराठी सेलिब्रिटींनी कमेंट केल्या आहे. अभिनेता जितेंद्र जोशी, सुबोध भावे तसचं अभिनेत्री मुक्ता बर्वे अशा अनेकांनी या फोटोला हार्टचं स्माईली दिलंय. तर अनेक चाहत्यांनी देखील स्वप्निलच्या फोटोला लाईक केलंय. “किती गोड, किती सुंदर” अशा अनेक कमेंट या फोटोला मिळाल्या आहेत. तर एका युजरने “तुझा जन्मचं हॅण्डसम” आहे अशी कमेंट दिलीय.

स्वप्निल जोशीने नऊ वर्षांचा असतानाच अभिनयाला सुरुवात केलीय. रामानंद सागर यांच्या ‘उत्तर रामायण’ या पौराणिक मालिकेत त्याने रामचा मुलगा कुशची भूमिका साकारली होती. तर ‘कृष्णा’ मालिकेत कृष्णाची भूमिका साकारत त्यानं सगळ्यांचं मनं जिकंल होतं.

सध्या स्वप्निल ‘समांतर-2’ या प्रोजेक्टवर काम करतोय. ‘समांतर’ या वेब सिरिजचा हा दुसरा भाग आहे. या वेब सीरिजचा पहिला भाग चांगलाच हिट ठरला. त्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता ताणली गेलीय.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 4, 2021 5:53 pm

Web Title: swapnil joshi shares childhood photo on his instagram account kpw 89
Next Stories
1 ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’चं फिमेल व्हर्जन लवकरच येणार… !!
2 कंगणावर तुटून पडले दीपिकाचे चाहते; जीन्सवरुन सुरु झालेल्या वादातून ‘सोशल राडा’
3 धक्कादायक! स्टंट दरम्यान उंचीवरुन पडल्यामुळे अभिनेत्याच्या नाकाला दुखापत
Just Now!
X