News Flash

‘मधु इथे, चंद्र…’; स्वप्नीलसाठी पत्नीने शेअर केली खास पोस्ट

...म्हणून लीनाने शेअर केली स्वप्नीलसाठी खास पोस्ट

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता म्हणजे स्वप्नील जोशी. ‘समांतर’, ‘मोगरा फुलला’ अशा चित्रपट व वेब सीरिजच्या माध्यमातून स्वप्नीलने त्याच्या चॉकलेट बॉय या प्रतिमेला छेद दिला आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून तो सातत्याने चर्चेत येत आहे. समांतर या गाजलेल्या सीरिजनंतर त्याची ‘समांतर 2’ ही सीरिजदेखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्यामुळे स्वप्नील सध्या व्यस्त आहे. परंतु, स्वप्नीलच्या आठवणीत व्याकूळ झालेल्या त्याच्या पत्नीने मात्र त्याच्यासाठी एक खास पोस्ट इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे.

अलिकडेच स्वप्नील आणि लीना यांच्या लग्नाचा वाढदिवस झाला. त्यानिमित्ताने लीनाने एक खास पोस्ट शेअर करत स्वप्नीलला शुभेच्छा दिल्या. ‘मधू इथे चंद्र पाचगणीला’, असं कॅप्शन देत लीनाने स्वप्नीलसोबतचे काही फोटो पोस्ट केले आहेत. सध्य स्वप्नील ‘समांतर 2’ मध्ये व्यस्त असून याचं चित्रीकरण पाचगणीमध्ये सुरु आहे. त्यामुळे लीनाने ही खास पोस्ट शेअर केली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by leena joshi (@lee1826)

दरम्यान, स्वप्नील सोशल मीडियावर सक्रीय असून अनेकदा तो त्याच्या कुटुंबीयांचे किंवा मुलांचे फोटो शेअर करत असतो.मात्र, यावेळी लीनाने त्याच्यासाठी शेअर केलेली पोस्ट पाहून अनेकांना आश्चर्य वाटलं आहे. लीना ही स्वप्नीलची दुसरी पत्नी असून यापूर्वी स्वप्नीलने अपर्णासोबत लग्न केलं होतं. मात्र, त्यांचं नातं फार काळ टिकलं नाही. २००९ मध्ये अपर्णा व स्वप्नील विभक्त झाले. त्यानंतर २०११ मध्ये स्वप्नीलनं औरंगाबादच्या लीनासोबत पुन्हा एकदा विवाहगाठ बांधली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 17, 2020 3:10 pm

Web Title: swapnil joshi wife leena share special post on their wedding anniversary ssj 93
Next Stories
1 सई- आदित्यची जोडी चाहत्यांमध्ये हिट; पण विराजस म्हणतो…
2 रामायणातील लक्ष्मणाने सेटवर केला होता मजेशीर प्रँक; फोटो पोस्ट करत सांगितली आठवण
3 “हिंदू धर्माला टार्गेट करणं थांबवा, अन्यथा…”; शक्तिमान बॉलिवूड चित्रपटांवर संतापला
Just Now!
X