News Flash

आणि बर्थडे केक कापतानाच स्वराला रडू कोसळलं, व्हिडीओ व्हायरल

"मी नशीबवान आहे"

आज 9 एप्रिलला अभिनेत्री स्वरा भास्करचा वाढदिवस आहे. स्वराला तिच्या कुटुंबियांसोबच तिच्या चाहच्यांनी देखील सोशल मीडियावरून शुभेच्छा दिल्या आहेत. यातच स्वराने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. स्वराच्या कुटुंबियांनी तिला सरप्राइज दिल्याचं या व्हिडीओत दिसतंय. कुटुंबाचं प्रेम पाहून स्वराला यावेळी भावना आवरणं कठीण झाल्याचं या व्हिडीओत पाहायला मिळतंय.

स्वराने हा व्हिडीओ शेअर करत म्हंटल आहे, “बर्थडे सरप्राईज.. माझ्या कुटुंबियांनी आणि माझ्यासोबत काम करणाऱ्यांनी माझ्यासाठी सेलिब्रेशन ठेवलं होतं. ते आधीच केल्यामुळे मला सरप्राइज मिळालं. मी जगातील सर्वात नशीबवान व्यक्ती आहे जिला असे आई वडील, कुटुंब आणि मित्र लाभले आहेत. ”

 

View this post on Instagram

 

A post shared by Swara Bhasker (@reallyswara)

स्वराने शेअर केलेल्या व्हिडीओत तिच्या समोर तीन एक ठेवल्याचं दिसतंय. यावेळी केक कापत असतानाच स्वरा रडायला लागल्याचं दिसतंय. तर अभिनेत्री सोनम कपूरनेदेखील स्वरासोबतचा एक फोटो शेअर करत तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sonam K Ahuja (@sonamkapoor)

सोनमने तिच्या पोस्टमध्ये म्हंटलं आहे, “प्रिय बहिण,आपण फक्त एक दिवस बोललो आणि माझ्या लक्षात आलं की मैत्री ही देवाने बनवलेली आहे. साक्षी..बिंदीया आणि चंद्रिका ज्या काही भूमिका तू साकारल्यास त्यापेक्षा मला सर्वात जास्त आवडणारी तुझी भूमिका म्हणजे तू ऑफ स्क्रिन जी आहेस ते.” असं म्हणत सोनमने स्वराला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 9, 2021 3:58 pm

Web Title: swara bhaskar became emotional and cried when family gives birthday surprise kpw 89
Next Stories
1 कुणीतरी येणार गं…‘रंग माझा वेगळा’ मालिकेत रंगणार दीपाच्या डोहाळ जेवणाचा कार्यक्रम
2 ‘शाहरुख, सलमान आणि आमिर नाही तर मीच राहणार नंबर वन’, अक्षय म्हणाला…
3 गर्दीचे सीन, गाण्यांच्या चित्रीकरणावर निर्बंध; ‘हे’ असतील चित्रपटसृष्टीसाठीचे नवे नियम
Just Now!
X