बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर तिच्या बिनधास्त व्यक्तव्यासाठी ओळखली जाते. ती सतत सामाजिक विषयांवर तिचे मत मांडत असेत. पण त्यामुळे तिला अनेक वेळा सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले आहे. आता स्वराने अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर सोशल मीडियावर सुरु असलेल्या नेपोटीझम या वादावर ट्विट केल्याचे म्हटले जाते.

स्वाराने ट्विटमध्ये, ‘सुशांतने आत्महत्या करण्यापूर्वी कोणतीही नोट लिहिलेली नाही. त्याला कोणत्या गोष्टीचा त्रास होत होता, कोणत्या परिस्थितीमधून जात होता हे आपल्याला माहित नाही. त्याने असे का केले हे देखील आपल्याला माहिती नाही. तुमचा राग काढणं थांबवा. त्याने कोणतीही नोट लिहिलेली नाही. समजलं?’ असे म्हटले आहे.

तर दुसऱ्या ट्विटमध्ये स्वाराने करण जोहर आणि आलिया भट्टला पाठिंबा दिला आहे

सुशांतच्या आत्महत्येनंतर सोशल मीडियावर करण जोहर आणि आलिया भट्टचा जुना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये त्या दोघांनी सुशांतची खिल्ली उडवली असल्याचे नेटकऱ्यांनी म्हटले होते. त्यानंतर नेटकऱ्यांनी आलियाला ‘नेपोटीझम प्रमोटर’ असे म्हणत सुनावले होते.

तर बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतने व्हिडीओ शेअर करत सुशांत सिंग राजपुतच्या आत्महत्येवरुन बॉलिवूडवर निशाणा साधला. सुशांतने आत्महत्या केली नव्हती तर त्याचा खून झाला आहे असे धक्कादायक व्यक्तव्य तिने केले. तसेच भारताची महिला कुस्तीपटू बबिता फोगटने तिला पाठिंबा देत बॉलिवूडवर निशाणा साधला.