News Flash

राहुल गांधींनी स्वीकारलं पुशअप्स चॅलेंज, स्वरा भास्कर म्हणाली…

जाणून घ्या स्वरा काय म्हणाली...

काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि वायनाडचे खासदार राहुल गांधी गेल्या काही दिवासांपासून चांगलेच चर्चेत आहेत. कधी ते केंद्रात स्वतंत्र मत्स्य उत्पादन मंत्रालयाची मागणी करतात, तर कधी पुद्दुचेरीमध्ये मच्छिमारांसोबत बोलता बोलता अचानक पाण्यात उडी घेतात. आता पुन्हा एकदा राहुल गांधी चर्चेत आले आहेत ते त्यांच्या पुश-अप चॅलेंजमुळे! सध्या राहुल गांधी तामिळनाडू दौऱ्यावर असून तिथेच एका शाळेच्या कार्यक्रमात त्यांनी हे पुशअप चॅलेंज घेतलं आहे. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. त्यांच्या व्हायरल झालेल्या या व्हिडीओ अभिनेत्री स्वरा भास्करने कमेंट केली आहे.

स्वरा भास्कर ही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती सतत समाजिक विषयावर बिनधास्तपणे तिचे मत मांडताना दिसते. आता स्वराने व्हायरल झालेला राहुल गांधींचा व्हिडीओ रिट्वीट केला आहे. हा व्हिडीओ रिट्वीट करत तिने दिलेल्या कॅप्शनने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या व्यक्तीला खेळांची किती आवड आहे या आशायचे कॅप्शन तिने दिले आहे. यामधून स्वराला राहुल गांधी हे फिटनेस फ्रीक म्हणजेच त्यांना तंदरुस्त राहण्याची आवड आहे आणि ही आवड अनेकदा सार्वजनिक कार्यक्रमांमधून दिसून आली आहे, असं म्हणायचं होतं.

आणखी वाचा- Rahul Gandhi Push-ups : आधी बॉक्सर अ‍ॅब्ज, आता पुशअप्स चॅलेंज; राहुल गांधींचा व्हिडिओ व्हायरल!

नेमकं झालं काय?

पुढील महिन्यात तामिळनाडूमध्ये विधानसभा निवडणुकांसाठी मतदान होणार आहे. त्यामुळे प्रचारसभा आणि संबंधित कार्यक्रमांसाठी राहुल गांधी सध्या तामिळनाडू दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यामध्ये राहुल गांधी थेट सामान्य मतदारांशी कनेक्ट होण्यासाठी वेगवेगळ्या क्लृप्त्या करताना दिसत आहेत. सोमवारी तामिळनाडूच्या मुलगमुड्डू या ठिकाणी असलेल्या सेंट जोसेफ मॅट्रिक स्कूलमध्ये राहुल गांधी विद्यार्थ्यांशी संवाद साधत होते. फिटनेसविषयी चर्चा सुरू असताना मेरोलिना शेनिघा (Merolina Shenigha) नावाच्या विद्यार्थिनीने त्यांना पुशअप चॅलेंज दिलं. “तुम्ही पुशअप्स मारू शकता का? आपण १५ पुशअप्स मारुयात!” असं ती म्हणाली. मेरोलिनाचं आगळं-वेगळं चॅलेंज राहुल गांधींनीही खिलाडू वृत्तीने स्वीकारलं. त्यांनी हातातला माईक बाजूला उभ्या असलेल्या शिक्षकांकडे सोपवून पुशअप्स मारायला सुरुवात केली. त्या मुलीने देखील हळूहळू पुशअप्स सुरू केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 2, 2021 12:30 pm

Web Title: swara bhaskar commented on rahul gandhi video seen doing push ups avb 95
Next Stories
1 सुनील शेट्टीच्या मुलाचं होणार मोठ्या पडद्यावर दमदार पदार्पण
2 Video: मालदीवच्या किनाऱ्यावर श्रद्धाचा हटके लूक
3 ‘हिंग..पुस्तक..तलवार’, लवकरच येतेय नवी कोरी विनोदी वेब सीरिज
Just Now!
X