शशांक घोष दिग्दर्शित ‘वीरे दी वेडिंग’ हा बहुचर्चित चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटामध्ये सोनम कपूर, करिना कपूर, स्वरा भास्कर आणि शिखा तस्लानिया या  अभिनेत्री प्रमुख भूमिकेमध्ये दिसून येणार आहेत. प्रदर्शनाच्या मार्गावर असलेल्या या चित्रपटाचे प्रमोशन सध्या जोरदार सुरु असून काही नेटक-यांनी स्वरा भास्करला तिच्या कपड्यांवरुन ट्रोल केले आहे. मात्र, यावेळी स्वराने ट्रोलक-यांना वेगळ्याच अंदाजात उत्तर दिले आहे.
‘वीरे दी.. ‘चे प्रमोशन करताना स्वराने पांढ-या रंगाचा फ्रॉकनुमा ड्रेस परिधान केला होता. हा ड्रेस ‘निरमा गर्ल’प्रमाणे दिसत असल्यामुळे नेटक-यांनी स्वराच्या नावावर ‘निरमा गर्ल’ असा ठपका ठेवला. मात्र, यावेळी स्वरा न चिडता हसत हसत या टीकेला सामोरी गेली. तिच्या याच अंदाजामुळे तिने ट्रोलक-यांची मनं जिंकून घेतली आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘मला लहानपणापासून असा ड्रेस घालायचा होता. माझं ते स्वप्नच होतं. या चित्रपटाच्या निमित्ताने का होईना पण माझं हे स्वप्न पूर्ण झालं’, असे ट्वीट स्वराने केले आहे.
पुढे ती असंही म्हणाली, ‘कोणत्याही टीकेवर चिडून प्रत्युत्तर देण्यापेक्षा अशा प्रसंगांना हसून उत्तर देणं कधीही योग्यच ठरतं. मेटा गालाच्यावेळी प्रियांका चोप्रालादेखील तिच्या कपड्यांवरुन ट्रोल करण्यात आलं होतं.मात्र तिने सुद्धा ट्रोलक-यांवर न चिडता हसत या प्रसंगाला सामोरी गेली होती’ . दरम्यान, स्वराच्या या वर्तणुकीमुळे तिने ट्रोलक-यांची मनं जिंकून घेतली आहेत. आगामी ‘वीरे दी..’मध्ये देखील ती अभिनयाच्या जोरावर अशीच प्रेक्षकांवर भुरळ पाडेल यात शंका नाही.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Swara bhaskar dress comparison with nirma girl
First published on: 25-05-2018 at 19:40 IST