News Flash

‘वीरे दी वेडिंग’सारखा चित्रपट मी पुन्हा कधीच करणार नाही- स्वरा भास्कर

चित्रपटाची शूटिंग संपताच तिने सुटकेचा नि:श्वास सोडला आणि पुन्हा कधीच अशी भूमिका साकारणार नसल्याचं ठरवलं.

स्वरा भास्कर

बिनधास्त राहणाऱ्या, वागणाऱ्या अशा चार मैत्रिणींची कथा ‘वीरे दी वेडिंग’ या चित्रपटात मांडल्याचं पोस्टर आणि ट्रेलरवरूनच स्पष्ट झालं. करिना कपूर खान, सोनम कपूर, स्वरा भास्कर आणि शिखा तल्सानिया यांची भूमिका असलेल्या या चित्रपटात लव्ह, लग्न आणि लोचामध्ये अडकलेल्या चौघींची कथा अत्यंत बोल्ड पद्धतीत रेखाटण्यात आली आहे. मात्र, या चित्रपटातील भूमिकेमुळे अभिनेत्री स्वरा भास्करला चांगलाच त्रास झाला आहे. म्हणूनच तिने भविष्यात असा चित्रपट किंवा अशा प्रकारची भूमिका पुन्हा कधीच साकारणार नसल्याची जणू शपथच घेतली आहे.

या चित्रपटात स्वरा भास्कर व्यसनाधीन आणि चेन स्मोकर असलेल्या तरुणीची भूमिका साकारत आहे. यासाठी धुम्रपान करावं लागल्याने स्वराचा त्याचा प्रचंड त्रास झाला. दिवसभर मळमळ आणि छातीत दुखण्याचा त्रास तिला जाणवू लागला होता. एका सीनच्या शूटिंगदरम्यान तिला बरेच सिगारेट ओढावे लागले होते, ज्यामुळे तिला खूप त्रास झाला होता. त्यातच दिग्दर्शकाने आणखी एक सिगारेट आणून दिली आणि त्याची चव अत्यंत वाईट होती, असं ती म्हणाली.

वाचा : सोशल मीडियावर अचानक का होतेय ‘बाहुबली’तल्या कुमार वर्माची चर्चा?

सोनम, करिना आणि शिखा यांच्यासोबत काम करताना मजा आली असली तरी धुम्रपानामुळे बराच त्रास सहन करावा लागल्याचं ती म्हणते. त्यामुळे चित्रपटाची शूटिंग संपल्यावर तिने सुटकेचा नि:श्वास सोडला.

स्वराला ऑनस्क्रीन धुम्रपान करावं लागल्याची ही काही पहिलीच वेळ नव्हती. याआधी ‘अनारकली ऑफ आरा’ या चित्रपटातही तिला विडी ओढावी लागली होती. ‘तनू वेड्स मनू’मध्येही तिला कंगना रणौतसोबत ऑनस्क्रीन सिगारेट ओढावी लागली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 23, 2018 10:10 am

Web Title: swara bhaskar has claimed that she will never do a film like veere di wedding again
Next Stories
1 सहमतची ‘अधुरी एक कहाणी’… ‘राजी’तील सहमतच्या पहिल्या प्रेमाबद्दल माहितीये का?
2 सोशल मीडियावर अचानक का होतेय ‘बाहुबली’तल्या कुमार वर्माची चर्चा?
3 नेहा धुपिया गरोदर? म्हणून केलं धावपळीत लग्न..
Just Now!
X