15 July 2020

News Flash

‘ही’ अभिनेत्री सोनू सूदला करतेय मदत; नेटकरी म्हणाले ही तर ‘सुपरवुमन’

मजुरांना मदत करणाऱ्या या अभिनेत्रीवर होतोय कौतुकाचा वर्षाव

करोना विषाणूच्या वाढत्या संक्रमणामुळे देशभरातील लोकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीत सेलिब्रिटींनी मदतीचा हात पुढे केला आहे. परंतु या सर्वांमध्ये सर्वाधिक चर्चा होतेय ती सोनू सूदची. मजुरांना त्यांच्या घरी पोहोचवण्याची जबाबदारी त्याने स्विकारली आहे. या कामात अभिनेत्री स्वरा भास्करही त्याला मदत करत आहे. यामुळे स्वराला आता ‘लेडी सोनू सूद’ असं म्हटलं जात आहे.

नितेश चौरसिया या ट्विटर हँडलवरुन स्वराच्या कामाची स्तुती करण्यात आली. “संकटात अडकलेल्या मजुरांना तुम्ही मदत करत आहात. तुमच्या कामाची जेवढी स्तुती करु तेवढी कमी आहे. तुम्ही तर लेडी सोनू सूद आहात.” अशा आशयाचे ट्विट करण्यात आले होते. या ट्विटवर स्वराने देखील गंमतीशीर प्रतिक्रिया दिली. “तुम्ही देखील उत्तम काम करत आहात. मला प्रोत्साहन दिल्याबद्दल धन्यवाद.” असं ती म्हणाली. स्वराचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचच लक्ष वेधून घेत आहे. काही तासांत शेकडो नेटकऱ्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

सोनू सूद कशाप्रकारे मजुरांची मदत करत आहे?

सोनू सूदने महाराष्ट्र सरकारकडून विशेष परवानगी घेऊन काही गाड्यांची सोय केली आहे. या गाड्यांमार्फत महाराष्ट्रातील मजूरांना त्यांच्या गावी नेऊन सोडले जात आहे. लक्षवेधी बाब म्हणजे ही सोय तो विनामुल्य देत आहे. “शेवटचा मजूर आपल्या घरी पोहोचेपर्यंत मी शांत बसणार नाही.” असं त्याने अलिकडेच दिलेल्या एका मुलाखतीत म्हटलं होतं. आनंदाची बाब म्हणजे या वाक्याचे तो तंतोतंत पालन करत आहे. त्याच्या मदतीमुळे मजुरांना त्यांच्या गावी सोडण्याचा महाराष्ट्र सरकारवरचा भार काही प्रमाणात कमी झाला आहे असे म्हटले जात आहे. यापूर्वी सोनुने एक हजार ५०० PPE किट्सची मदत केली होती. तसेच आपले हॉटेल करोनाग्रस्तांच्या उपचारासाठी खुले करुन दिले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 2, 2020 7:25 pm

Web Title: swara bhaskar lady sonu sood help migrant workers amid covid 19 pandemic mppg 94
Next Stories
1 लॉकडाउनमध्ये मुंबईतील व्हिडीओ शूट करून अभिनेत्री करतेय प्रेक्षकांचं मनोरंजन
2 महिला आरोग्य कार्यकर्त्यांच्या शॉट फिल्मची कमाल; २४ तासांत मिळाले ४० लाख व्हूज
3 विनोदवीर सागर कारंडे लॉकडाउनमध्ये घेतोय ‘हे’ ऑनलाइन धडे
Just Now!
X