20 February 2020

News Flash

लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी गेलेल्या स्वरा भास्करची चप्पल चोरीला

खुद्द स्वरा भास्करने सोशल मीडिया पोस्टद्वारे याची माहिती दिली आहे

लालबाग राजाचे दर्शन घेण्यासाठी लाखो गणेशभक्त हजारो मैल प्रवास करुन येत असतात. गणरायाच्या दर्शनाला लोटणाऱ्या भाविकांच्या गर्दीत काय किस्से घडतील सांगता येत नाही. लालबागच्या राजाच्या दर्शनाला येणाऱ्या अलोट गर्दीतही असाच एक प्रकार घडला आहे, तो म्हणजे चप्पल चोरीचा. आणि चोरीला गेलेली चप्पल दुसरं तिसरं कुणाची नसून अभिनेत्री स्वरा भास्कर हिची आहे.

स्वरा काल रात्री ११ सप्टेंबर रोजी लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी गेली होती. दरम्यान तिने लाल रंगाचा ड्रेस, कानात लाला आणि सोनारी रंगाचे ड्रेसवर मॅचिंग कानातले, काळ्या रंगाची टिकली आणि त्यावर साजेशी कोल्हापूरी चप्पल परिधान केली होती. स्वरा या लूकमध्ये अत्यंत सुंदर दिसत होती. लालबागच्या राजाचे दर्शन घेतल्यानंतर स्वराची कोल्हापूरी चप्पल हरवल्याचे तिच्या लक्षात आले. त्यानंतर स्वरा अनवाणी गाडीत येऊन बसली.

आणखी वाचा : बसस्टॉप आणि ती मुलगी; बीग बींनी सांगितला कॉलेज जीवनातील खास किस्सा

खुद्द स्वरा भास्करने सोशल मीडिया पोस्टद्वारे याची माहिती दिली आहे. स्वराने पोस्टमध्ये तिचा अनावाणी फिरतानाचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत स्वराने मजेशीर कॅप्शनही दिले आहे. सध्या तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. नेटकऱ्यांनी स्वराला ट्रेल करण्यासही सुरुवात केली आहे.

First Published on September 12, 2019 5:37 pm

Web Title: swara bhaskar lost her sandal at lalbaug ganpati avb 95
Next Stories
1 नक्कल करु नको असं सांगणाऱ्या लतादीदींना रानू मंडल यांचे उत्तर, म्हणाल्या…
2 बसस्टॉप आणि ती मुलगी; बीग बींनी सांगितला कॉलेज जीवनातील खास किस्सा
3 तिच्याबरोबर एक दिवस घालवण्यासाठी आठ कोटी मोजायला तयार होता ब्रॅड पिट, पण…
Just Now!
X