काही महिलांना त्यांचं वय लपवायला आवडतं. त्यांच वय कोणाला कळलं तर त्यांना वृद्ध समजतील अशी भीती त्यांना वाटते. त्यामुळे मुळातच अशा महिला वय सांगत नाही अन् समजा सांगितलच तर ते खरे असेल याची खात्री देता येत नाही. अभिनेत्री स्वरा भास्करला देखील स्वत:चं वय लपवायला आवडतं. किंबहूना गेली काही वर्ष ती स्वत:चं वय २५ सांगत होती.
अवश्य पाहा – ‘रेप सीन पाहून आईनं घरातून बाहेर काढलं होतं’; रंजीत यांनी सांगितला थक्क करणारा अनुभव
स्वराने एबीपीला दिलेल्या मुलाखतीत हा चकित करणारा अनुभव सांगितला. ती म्हणाली, “मी स्वत:चं वय नेहमी एक दोन वर्ष कमीच सांगायचे. मी २८ वर्षांचे होते तेव्हा मी केकवर २५ वा वाढदिवस असं लिहिलं होतं. त्यानंतर पुढील चार वर्ष मी २५ वर्षांचेच होते. पण एक दिवस माझी चोरी पकडली गेली अन् मी २५ वर्षांची नाही हे सर्वांना कळलं. अर्थात त्यासाठी माझे कुटुंबीयच जबाबदार होते. असो, पण महिलांना त्यांचं वय सांगायला आवडत नाही. कारण कोणी आम्हाला वृद्ध म्हणू नये याची भीती वाटते. आता मी ३२ वर्षांची आहे. कदाचित पुढील काही वर्ष मी ३२ वर्षांचीच राहीन.”
अवश्य पाहा – अभिनेत्रीने पाळल्या ८० हजार मधमाशा; कारण वाचून व्हाल थक्क
स्वरा भास्कर ही बॉलिवूडमधील एक नामांकित अभिनेत्री आहे. तिने ‘रांजना’, ‘तन्नू वेड्स मन्नू’, ‘लिसन अमाया’, ‘अनारकली ऑफ आग्रा’ यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांतून आपल्या दर्जेदार अभिनयाचं प्रदर्शन केलं आहे. ती देशभरात घडणाऱ्या विविध घडामोडींवर रोखठोक मतं मांडते या पार्श्वभूमीवर तिचा वय लपवण्याचा हा किस्सा सध्या सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on November 15, 2020 4:09 pm