News Flash

लग्नासाठी स्वरा भास्कर तयार, फोटो शेअर करत म्हणाली…

तिचे हे ट्वीट सध्या चर्चेत आहे.

बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर ही कामयच चर्चेत असते. ती सोशल मीडियाच्या माध्यमातून बिनधास्तपणे सामाजिक विषयांवर तिचे मत मांडताना दिसते. अनेकदा तिला या गोष्टीमुळे सोशल मीडियावर ट्रोल देखील करण्यात येते. पण स्वरा देखील शांत बसत नाही. ती ट्रोलर्सला सडेतोड उत्तर देताना दिसते. स्वरा ही अविवाहित आहे. आता स्वराने तिचा फोटो सोशल मीडियावर शेअर करत लग्नासाठी तयार असल्याचे म्हटले आहे.

नुकताच स्वराने ट्विटर अकाऊंटवर तिचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत तिने लग्नासाठी मुलगा हवा आहे अशा आशयाची एक पोस्ट लिहिली आहे. ‘अरेंज मॅरेजसाठी हा फोटो. या फोटोत दिसणाऱ्या मुलीला स्वयंपाक येत नाही, चहा कधी कधी चांगला करता येतो…तिच्यासोबत एक कुत्रा आहे. ती त्या कुत्र्याला तिचा मुलगा समजते. कधी कधी तिच्या डोक्यात बंडखोरीचे विषय येतात, आंदोलनजीवी आणि देशद्रोही असल्याचा तिच्यावर आरोप आहे… चांगल्या घरची सून होण्यासाठी उत्तम मुलगी’ या आशयाचे ट्वीट स्वराने केले आहे. त्यासोबतच तिने हसण्याचे इमोजी वापरले आहेत.

स्वराने केलेले हे ट्वीट सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहे. अनेकांनी यावर कमेंट केल्या आहेत. तर काहींनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. स्वराचे प्रत्येक ट्वीट हे चर्चेचा विषय ठरतो.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 7, 2021 1:14 pm

Web Title: swara bhaskar tweet related marriage viral on social media avb 95
Next Stories
1 ‘या’ कारणामुळे प्रदर्शनापूर्वीच ‘गंगूबाई काठियावाडी’ वादाच्या भोवऱ्यात?
2 बाळाला कडेवर घेऊन महिला कॉन्स्टेबल करतेय ड्यूटी; व्हिडीओ शेअर करत स्वरा म्हणाली…
3 त्या कार्यक्रमात भेट झाली अन्…, जाणून घ्या किरण आणि अनुपम खेर यांची लव्ह स्टोरी
Just Now!
X