10 July 2020

News Flash

‘तेव्हा मी १५ वर्षांची होती’; चुकीचे वय सांगितल्याने स्वरा भास्कर ट्रोल

३१ वर्षांची स्वरा २०१० साली १५ वर्षांची कशी असेल असा सवाल नेटकऱ्यांनी उपस्थित केला आहे.

स्वरा भास्कर

एका वृत्तवाहिनीच्या चर्चासत्रादरम्यान चुकीचं वय सांगितल्याने बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर पुन्हा एकदा सोशल मीडियावर ट्रोल झाली आहे. या चर्चासत्रादरम्याने बरेच व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. या व्हिडीओवरून स्वरा भास्कर ट्रोलिंगची शिकार झाली आहे. एनआरसी आणि सीएए या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी स्वरा भास्कर या चर्चासत्रात सहभागी झाली होती. तिच्यासोबत अभिनेता मोहम्मद झिशान अयूब आणि दिग्दर्शक तिग्मांशू धुलिया उपस्थित होते.

वृत्तवाहिनीच्या निवेदिकेने स्वराला प्रश्न विचारला की, “२०१० मध्ये जेव्हा एनपीआरची प्रक्रिया सुरु झाली तेव्हा तुमचा विरोध नव्हता. मग आताच विरोध का?” यावर स्वराने म्हटलं, “२०१० मध्ये मी १५ वर्षांची होती.” ३१ वर्षांची स्वरा २०१० साली १५ वर्षांची कशी असेल असा सवाल नेटकऱ्यांनी उपस्थित केला आहे. या वक्तव्यावरून ट्विटरकरांनी स्वराची खिल्ली उडवली असून #MathematicianSwara असा उपरोधिक हॅशटॅगसुद्धा जोरदार ट्रेण्ड होऊ लागला आहे.

Next Stories
1 शिवजयंती दणक्यात साजरी करणाऱ्यांना मृणाल कुलकर्णींचा मार्मिक प्रश्न
2 …तर मीसुद्धा बुरखा घातला असता; ए. आर. रहमान यांचं मुलीच्या बुरखा प्रकरणावर उत्तर
3 ‘दिल्ली क्राइम 2’ मध्ये खरा आयएएस अधिकारी साकारणार वेब सीरिजमधील भूमिका!
Just Now!
X