शेती कायद्याविरोधातील शेतकऱ्यांचा सातत्यपूर्ण संघर्ष आणि दिल्ली गाठण्याच्या निर्धारासमोर नमतं घेत शुक्रवारी अखेर केंद्र सरकारनं आंदोलकांना दिल्लीत प्रवेश करण्यास परवानगी दिली. तसंच दिल्लीच्या उत्तर-पश्चिम टोकाला असलेल्या बुराडी येथील निरंकारी मैदानावर शांततेनं निदर्शन करण्याची मुभा देण्यात आली. शुक्रवारी संध्याकाळी शेतकरी जथे येऊ लागले होते. दरम्यान, आंदोलनातील एक फोटो अभिनेत्री स्वरा भास्करने शेअर केला आहे.
स्वराने तिच्या ट्विटर अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये एक जवान शेतकऱ्यावर लाठी चार्ज करताना दिसत आहे. हा फोटो शेअर करत तिने ‘वेदनादायी गोष्ट हीच की, जवान देखील एका शेतकऱ्याचाच मुलगा असू शकतो’ या आशयाचे कॅप्शन दिले आहे.
सबसे दुख की बात ये है कि ये जवान भी किसान का ही बेटा होगा! #FarmersDelhiProtest #FarmersProtests pic.twitter.com/Po7x4biCRz
— Swara Bhasker (@ReallySwara) November 27, 2020
‘संयुक्त किसान मोर्चा’ या बॅनरखाली पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, राजस्थान केरळ, महाराष्ट्र अशा विविध राज्यांतील पाचशे शेतकरी संघटना एकत्र आल्या होत्या. तर दुसरीकडे केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र तोमर यांनी करोनाच्या काळातील हे आंदोलन थांबवण्याचे आवाहन केले आहे. शेतकरी संघटनांना चर्चेसाठी ३ डिसेंबरला बोलावले असल्याचा तोमर यांनी पुनरुच्चार केला.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on November 28, 2020 2:27 pm