24 September 2020

News Flash

‘शिवीगाळ करायची असेल तर मला कर पण कृपया…’; स्वरा भास्करची कंगनाला विनंती

कंगनाने जया बच्चन यांच्यासाठी केलेल्या ट्विटवरून स्वराने व्यक्त केला संताप

अभिनेत्री जया बच्चन यांनी केलेल्या अप्रत्यक्ष टीकेनंतर कंगना रणौतने ट्विट करत प्रत्युत्तर दिलं. जया बच्चन आणि इंडस्ट्रीने मला कोणतीही ‘थाळी’ दिली नसल्याचं कंगनाने ट्विटमध्ये म्हटलं असून शय्यासोबत केल्यानंतर बॉलिवूडमध्ये दोन मिनिटांची भूमिका मिळते असा आरोप तिने केला. कंगनाच्या या ट्विटनंतर अभिनेत्री स्वरा भास्करने तिला हा वाद इथेच थांबवण्याची विनंती केली. ही अत्यंत लज्जास्पद टिप्पणी असल्याचं मत स्वराने मांडलं. त्याचसोबत यापुढे जर शिवीगाळ करायची असेल तर मला कर, असंही स्वरा कंगनाला म्हणाली.

स्वराने ट्विटरवर लिहिलं, ‘हे अती होतंय कंगना. ही लज्जास्पद टिप्पणी आहे. आता पुरे झालं. तुझ्या मनातील घाण तुझ्यापर्यंतच ठेव. शिवीगाळ करायची असेल तर मला कर. मी तुझी बेताल वक्तव्यं आनंदाने ऐकेन आणि चिखलफेकीचा हा खेळ तुझ्यासोबत खेळेन. मोठ्यांचा आदर करणे ही भारतीय संस्कृतीची पहिली शिकवण आहे आणि तू तर कथित राष्ट्रवादी आहेस.’

आणखी वाचा- “हिरोसोबत झोपल्यानंतरच…,” जया बच्चन यांना प्रत्युत्तर देताना कंगनाचा नवा आरोप

काय आहे प्रकरण?

मंगळवारी राज्यसभेत शून्य प्रहरमध्ये बॉलिवूड इंडस्ट्रीचा मुद्दा मांडण्यात आला होता. अभिनेते आणि भाजपा खासदार रवी किशन यांनी इंडस्ट्रीतील कलाकारांकडून होणाऱ्या ड्रग्स सेवनाचा मुद्दा उपस्थित करत त्याविषयी चौकशीची मागणी केली होती. जया बच्चन यांनी यावर आक्षेप घेत “ज्या ताटात खातात, त्याच ताटात नंतर छेद करतात”, अशा शब्दांत टीका केली होती.

कंगनाने जया बच्चन यांच्या टीकेला उत्तर देणारं ट्विट करत लिहिलं, “जयाजी आणि त्यांच्या इंडस्ट्रीने कोणती थाळी दिली आहे. एक थाळी मिळाली होती ज्यामध्ये दोन मिनिटांचे आयटम नंबर्स आणि एक रोमँटिक सीन मिळायचा तोदेखील हिरोसोबत झोपल्यानंतर…मी इंडस्ट्रीला स्त्रीवादाचा धडा दिला. थाळी देशभक्ती, स्त्रीप्रधान चित्रपटांनी सजवली. जयाजी ही माझी थाळी आहे तुमची नाही”.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 16, 2020 3:11 pm

Web Title: swara bhasker says sickening kangana now stop these shameful comment to kangana ranaut ssv 92
Next Stories
1 ‘तू मला सोडून गेलास तर…’; सुझानच्या ‘त्या’ पोस्टवर हृतिकची कमेंट
2 “सुशांतच्या नावाखाली मिळणारी प्रसिद्धी नकोय”
3 मुलाच्या वाढदिवशी अक्षय कुमार भावूक; पोस्ट शेअर करत म्हणाला…
Just Now!
X