23 September 2020

News Flash

सुशांतचा मृतदेह नेणाऱ्या रुग्णवाहिका चालकाला धमक्यांचे फोन; स्वरा भास्कर संतापली चाहत्यांवर

सुशांत सिंह राजपूतचा मृतदेह घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेच्या चालकाला आता सुशांतच्या चाहत्यांकडून धमक्यांचे फोन येत आहेत.

अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा मृतदेह घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेच्या चालकाला आता सुशांतच्या चाहत्यांकडून धमक्यांचे फोन येत आहेत. त्या चालकावर सुशांतला जीवे मारण्याचे आरोप केले जात असून गेल्या काही दिवसांपासून त्याला सतत धमक्यांचे फोन येत आहेत. याप्रकरणी अभिनेत्री स्वरा भास्करने तीव्र संताप व्यक्त केला आहे. तुम्हाला लाज वाटली पाहिजे, असं म्हणत स्वरा चाहत्यांवर भडकली आहे.

‘याला काय अर्थ आहे? स्वत:ला चाहते म्हणायला तुम्हाला लाज वाटली पाहिजे. तुम्ही चाहते नाहीत, तर बुद्धिहीन लोकांचा जमाव आहे’, असं ट्विट स्वराने केलं.

सुशांतने आत्महत्या केल्यानंतर त्याचा मृतदेह रुग्णालयात नेण्यात आला होता. ही रुग्णवाहिका विशाल बंदगार चालवत होते. परंतु, रुग्णवाहिकेमध्येच सुशांतचा गळा आवळून त्याचा खून केल्याचं काही चाहत्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे सध्या हे काही चाहते विशाल बंदगारला सतत फोन करुन धमकी देत आहेत. इतकंच नाही तर दिवसातून असे धमकीचे अनेक फोन येत असून ते अर्वाच्च भाषेत बोलतात असंही, विशालने सांगितलं आहे.

काय म्हणाला रुग्णवाहिकेचा चालक?

मी आणि माझा भाऊ शहरातील अनेक रुग्णालयात रुग्णवाहिका चालक म्हणून काम करतो. परंतु, मी सुशांतचा मृतदेह रुग्णवाहिकेतून घेऊन गेलो तेव्हापासून आज एक महिना झाला, मला सतत धमकीचे फोन येत आहेत, असं विशाल म्हणाला.

पुढे तो म्हणतो, बऱ्याच वेळा हे चाहते अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करतात. तसंच रुग्णालयात नेतांना सुशांत जीवंत होता, मात्र रुग्णवाहिकेत त्याचा गळा आवळा गेला त्यामुळे तुम्हाला त्याची शिक्षा मिळेल असंही चाहते म्हणतात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 6, 2020 4:30 pm

Web Title: swara bhasker slams fans who threatens ambulance driver who carried dead body of sushant singh rajput ssv 92
Next Stories
1 “मी चुकलो,” अमिताभ यांनी मागितली लेखकाची माफी; जाणून घ्या कारण…
2 …अशी झाली ‘मुल्क’मध्ये ऋषी कपूर यांची एण्ट्री; अनुभव सिन्हांनी दिला आठवणींना उजाळा
3 ‘या’ महिन्यात येणार करोना लस; चेतन भगत यांनी केली भविष्यवाणी
Just Now!
X