निर्माता अली अब्बास जफर निर्मित ‘तांडव’ ही वेब सीरिज प्रदर्शित होताच वादाच्या भोवऱ्यात अडकली. या वेब सीरिची कथा आणि त्यामधील काही दृष्यांवरुन सुरु झालेल्या वादानंतर तांडवच्या संपूर्ण टीमकडून यासंदर्भात माफी मागण्यात आली आहे. दरम्यान अभिनेत्री स्वरा भास्करने ट्वीट केले आहे. तिचे हे ट्वीट सध्या चर्चेत आहे.
स्वराने ‘तांडव’ या वेब सीरिजच्या वादावार ट्वीट केले आहे. ‘मी सुद्धा हिंदू आहे आणि मी तांडवच्या कोणत्याही दृश्यावर नाराज नाही. मग तांडव सीरिजवर बंदी का आणायला हवी?’ या आशयाचे ट्वीट स्वराने केले आहे. तिचे हे ट्वीट सध्या व्हायरल झाले असून चर्चेत आहे. अनेकांनी तिला या ट्वीटमुळे ट्रोल केले आहे.
I’m a Hindu and I’m not offended by any scene in #Tandav ..
Why #banTandavSeries #BanTandavNow ???— Swara Bhasker (@ReallySwara) January 19, 2021
काय आहे प्रकरण?
‘तांडव’ वेब सीरिजच्या पहिल्याच भागातील एका दृश्यामध्ये मोहम्मद झीशान अयूब नाटकात काम करत आहे. त्याने भगवान शंकराची भूमिका साकारली आहे. दरम्यान तो नाटकामध्ये अपशब्द वापरताना दिसतो. या दृश्यामुळे हिंदुंच्या भावना दुखावल्या गेल्याचा आरोप केला जात होता. तसेच हिंदू देवतांचा अपमान करण्यात आला असल्याचा आरोप काहींनी केले. मुंबईत या वेबसीरीज विरोधात पोलिसांत तक्रार दाखल झाल्यानंतर उत्तर प्रदेशात अॅमेझॉन प्राइमच्या भारतातील प्रमुखांसह ‘तांडव’च्या निर्माता-दिग्दर्शक, लेखकावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता सीरिजच्या संपूर्ण टीमने माफी मागितली आहे.
आणखी वाचा- ‘तांडव’ शांत! वेब सीरिजमधील ‘ते’ वादग्रस्त दृश्य हटवणार
हिमांशु किशन मेहरा आणि अली अब्बास जफरद्वारा निर्मित ‘तांडव’ ही सीरिज ९ भागांची आहे. त्यात सैफ अली खानसोबत डिंपल कपाडिया, सुनील ग्रोव्हर, तिग्मांशू धुलिया, डीनो मोरिया, कुमुद मिश्रा, गौहर खान, अमायरा दस्तूर, मोहम्मद झीशान अय्यूब, कृतिका कामरा, सारा जेन डायस, संध्या मृदुल, अनूप सोनी, हितेन तेजवानी, परेश पाहुजा आणि शोनाली नागराणी हे कलाकार आहेत.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 20, 2021 12:25 pm