अभिनेत्री स्वरा भास्कर सोशल मीडियावर सक्रीय असते. तिच्या वादग्रस्त आणि बेधडक ट्विट्समुळे अनेकदा तिला ट्रोलिंगचाही सामना करावा लागतो. लोकसभा निवडणुकीत स्वराने कन्हैय्या कुमारसाठी प्रचार केला. यावरून एका युजरने आक्षेपार्ह भाषेत तिच्यावर टिप्पणी केली. या ट्विटविरोधात स्वराने थेट मुंबई पोलिसांकडे धाव घेतली आहे.

‘स्वत:ला मूर्ख, अभिमानी आणि भाग्यशाली राष्ट्रवादी व हिंदू समजणारा हा व्यक्ती त्याच्या आणि माझ्या धर्माला व देशाला लाज आणणारे वक्तव्य करतोय. त्याचं हे असं ट्विट करणं म्हणजे एखाद्या मुलीची छेडछाड व छळ करण्यासारखंच आहे,’ असं म्हणत स्वराने मुंबई पोलिसांना टॅग केलं. स्वराच्या या ट्विटला मुंबई पोलिसांनी त्वरित उत्तर दिलं. ‘आम्ही तुम्हाला फॉलो केलं आहे. तुमचा फोन नंबर आम्हाला पाठवा. या प्रकरणाला प्राधान्य देऊन आम्ही तपास करत आहोत,’ असं ट्विट मुंबई पोलिसांकडून करण्यात आलं.

आणखी वाचा : अक्षय कुमार, प्रभास, जॉनला गणेश गायतोंडेचं आव्हान

मुंबई पोलिसांनी केलेल्या मदतीबद्दल स्वराने त्यांचे आभार मानले. ‘त्वरित रिप्लाय देण्यासाठी खूप खूप धन्यवाद आणि तुमचं सोशल मीडिया अकाऊंट सतत आमच्या सेवेत हजर राहत असल्याने तुम्हाला सलाम,’ अशा शब्दांत स्वराने कृतज्ञता व्यक्त केली.