News Flash

“ताई तुला वेड लागलं आहे का?”; वाईनसोबत बिस्किट खाणारी स्वरा होतेय ट्रोल

स्वरा भास्करच्या या ख्रिसमस रेसिपीची उडवली जातेय खिल्ली; पाहा व्हिडीओ...

स्वरा भास्कर ही बॉलिवूडमधील एक प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. चित्रपटांसोबतच ती सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय असते. व्हायरल होणारे व्हिडीओ, ट्विट्स आणि फोटोंच्या माध्यमातून ती कायम चर्चेत असते. यावेळी देखील ती अशाच एका थक्क करणाऱ्या व्हिडीओमुळे चर्चेत आहे. तिने नुकताच नाताळ साजरा करतानाचा एक व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओमध्ये ती चक्क वाईनमध्ये बिस्किट बुडवून खाताना दिसत आहे. तिचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

अवश्य पाहा – सोज्वळ सुनेचा बिकिनी अवतार; हॉट फोटोशूटमुळे चाहते अवाक

 

View this post on Instagram

 

A post shared by Filmfare (@filmfare)

अवश्य पाहा – सलमानमुळेच ‘या’ अभिनेत्रींना करता आलं बॉलिवूडमध्ये पादार्पण

वाईनसोबत बिस्किट खाण्याची मजा काही वेगळीच असते. हे पाहा, अशा प्रकारे बिस्किट वाईनमध्ये बुडवा आणि विरघळण्याच्या आत खाऊन टाका. अशा आशयाचं वक्तव्य करत स्वराने बिस्किट खाण्याची ही अनोखी कल्पना चाहत्यांना सुचवली आहे. मात्र ही कल्पना काही नेटकऱ्यांना आवडली नाही. त्यांनी स्वराला जोरदार ट्रोल करण्यास सुरुवात केली. तुझा मेंदू गुडघ्यात आहे का?, आम्ही तर चहासोबत बिस्किट खातो, ताई तुला वेड लागलं आहे का? अशा आशयाच्या प्रतिक्रिया देत काही ट्रोलर्सनं या व्हिडीओची जोरदार खिल्ली उडवली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 28, 2020 11:36 am

Web Title: swara bhasker video viral swara bhasker christmas recipe mppg 94
Next Stories
1 ‘३ इडियट्स’मधील भूमिकेसाठी बोमन इराणींना शिकावी लागली ‘ही’ अजब कला
2 गौरव घाटणेकर एकाच वेळेस मराठी व हिंदीत
3 देवमाणूस मालिकेचे १०० भाग पूर्ण; सेटवर सेलिब्रेशन