News Flash

ट्विटर वॉरमध्ये कंगनाची माघार; स्वरा भास्करच्या तक्रारीनंतर ‘ते’ ट्विट केलं डिलिट

स्वराने तक्रार करताच कंगना घाबरली?; ते वादग्रस्त ट्विट केलं डिलिट

अभिनेत्री कंगना रनौत सध्या बॉलिवूडमधील कलाकारांशी सातत्याने पंगा घेताना दिसत आहे. अलिकडेच तिचे तापसी पन्नूसोबत खटके उडाले होते. त्यानंतर आता ती अभिनेत्री स्वरा भास्करसोबत ट्विटर वॉर करताना दिसत आहे. मात्र यामधील लक्षवेधी बाब म्हणजे या वादातून कंगनाने काहीशी माघार घेतली आहे. स्वराच्या तक्रारीनंतर कंगनाने आपलं वादग्रस्त ट्विट लगेचच डिलिट करुन टाकलं आहे.

नेमकं हे प्रकरण काय आहे?

अलिकडेच दिलेल्या एका मुलाखतीत कंगनाने स्वराला घराणेशाहीची ‘चमची’ असं म्हटलं होतं. त्यानंतर “पाकिस्तानी माझ्या कामात लुडबुड करु नकोस” अशा आशयाचं ट्विट करुन स्वराला धमकीवजा इशारा दिला होता. या ट्विटमुळे स्वरा संतापली. तिने लगेचच या बाबत तक्रार केली. “या ट्विटमार्फत कंगनाने माझ्यावर वर्णद्वेषी टिप्पणी केली” असा आरोप तिने केला. यानंतर लगेचच कंगनाच्या टीमने ते ट्विट डिलिट केले. सध्या हे ट्विटर वॉर सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

यापूर्वी कंगना आलिया भट्टमुळे चर्चेत होती. मृत्यूनंतर सुशांत ट्विटरवर ‘आलिया भट्ट’ला फॉलो करतोय का? असा प्रश्न तिने विचारला होता. “आता तर सुशांतच्या प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी. रियाकडे सुशांतचे सर्व गॅजेट्स आहेत. कदाचित महेश भट्ट यांच्या आदेशाखालीच तिने आलिया भट्टला फॉलो केलं असेल. सुशांतचे अनेक पोस्ट डिलिट देखील करण्यात आले होतं.” अशा आशयाचं ट्विट तिने आपल्या टीमच्या ट्विटर हँडलवरुन केलं होतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 30, 2020 4:03 pm

Web Title: swara bhasker vs kangana ranaut twitter war mppg 94
Next Stories
1 अभिषेकच्या ‘ब्रीद : इन टू द शॅडोज’चा तिसरा सीझन येणार?
2 शहनाज गिलने भाड्याचे कपडे परत दिले नाहीत; डिझायनरचा आरोप
3 “मुंबई पोलिसांकडून सुशांतचं प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला जातोय”
Just Now!
X