17 January 2021

News Flash

‘स्वराज्यजजनी जिजामाता’ मालिकेतील अमृता पवारला करोनाची लागण

ही मालिका काही वर्षांचा लीप घेणार आहे.

‘स्वराज्यजननी जिजामाता’ या मालिकेत जिजामातांची भूमिका साकारणारी अभिनेत्री अमृता पवार हिला करोनाची लागण झाली आहे. अनलॉकदरम्यान सर्वांत आधी शूटिंग सुरू करणाऱ्या मालिकांपैकी ही एक होती. सर्दीची लक्षणं जाणवल्यानंतर अमृताने करोनाची चाचणी केली. या चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला.

याविषयी अमृता ‘टाइम्स ऑफ इंडिया’शी बोलताना म्हणाली, “मला सर्दी झाली होती. खबरदारीचा उपाय म्हणून मी आधी करोनाची चाचणी केली. त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर मी मालिकेच्या टीमला त्याची माहिती दिली. माझ्यानंतर सेटवरील इतरांनीही करोनाची चाचणी केली आणि सुदैवाने सर्वांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला.” अमृता सध्या घरीच क्वारंटाइनमध्ये राहत आहे.

‘स्वराज्यजननी जिजामाता’ ही मालिका काही वर्षांचा लीप घेणार असून मालिकेत प्रेक्षकांना नवे चेहरे पाहायला मिळणार आहेत. जिजाऊ माँ साहेबांची भूमिका भार्गवी चिरमुले ही अभिनेत्री करणार आहे, तर शहाजी राजांची भूमिका शंतनू मोघे हा अभिनेता करणार आहे शिवबांच्या भूमिकेत दिवेश मेडगे हा बालकलाकार दिसणार आहे. दिवेशने या आधी स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेत छोट्या संभाजीची भूमिका साकारली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 8, 2020 1:07 pm

Web Title: swarajya janani jijamata actress amruta pawar tests positive for covid 19 ssv 92
Next Stories
1 “खरंच कंगनाला Y+ सुरक्षा देणार का?”; अभिनेत्रीचा केंद्राला सवाल
2 “ट्विटरवर टिवटिव करणाऱ्या कंगनाला Y+ सुरक्षा का?”
3 ‘करण जोहरने मला कमीपणा दाखवायचा प्रयत्न केला’; आमिर खानच्या भावाचा खुलासा
Just Now!
X