News Flash

Pulwama Attack : टी- सीरिजनं युट्यूबवरून हटवली पाकिस्तानी गायक राहत फतेह अली खान- आतिफ अस्लमची गाणी

राहत फतेह अली खान आणि आतिफ अस्लम यांची गाणी युट्यूबवरून हटवण्यात आली आहे

टी- सीरिजनं आपल्या युट्यूबवरनं राहत फतेह अली खान आणि आतिफ अस्लमची गाणी हटवली आहेत.

पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर टी- सीरिजनं पाकिस्तानी गायक राहत फतेह अली खान आणि आतिफ अस्लम यांची गाणी युट्यूब चॅनेलवरून हटवली आहेत.

भारतीय संगीतकारांनी पाकिस्तानी गायक किंवा कलाकारांना भारतात काम देऊ नये, अन्यथा मनसे धडा शिकवेल असा इशारा मनसे सिने विभागाचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी गेल्या आठवड्यात दिला होता. त्यानंतर टी- सीरिजनं आपल्या युट्यूबवरनं राहत फतेह अली खान आणि आतिफ अस्लमची गाणी हटवली आहेत. टी- सीरिज हे जगातील सर्वाधिक पाहिलं गेलेलं दुसऱ्या क्रमांकाचं युट्युब चॅनेल आहे. काही दिवसांपूर्वी पाकिस्तानी गायक राहत फतेह अली खान आणि आतिफ अस्लम यांनी टी सीरिजसाठी एकत्र येऊन गाणी गायली होती. व्हॅलेंटाइन डे दिवशी आतिफ अस्लमचं ‘बारिशें’ हे गाणं टी- सीरिजनं लाँच केलं होतं . मात्र पुलवामा हल्ल्यानंतर हे गाणं काढून टाकण्यात आलं आहे .

पाकिस्तानी कलाकारांसोबत काम करणं थांबवा अशा इशारा पुलवामा हल्ल्यानंतर टी-सीरिज, सोनी म्यूजिक, वीनस, टिप्स यांसारख्या म्युझिक कंपन्यांना मनसेनं दिला होता. त्यानंतर टी-सीरिजनं पाऊल उचलत दोन पाकिस्तानी गायकांचे म्युझिक व्हिडिओ काढून टाकले आहेत.
तर रविवारी ‘फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईज’कडून मुंबईच्या फिल्मसिटीत जोरदार निदर्शने करण्यात आली. बॉलिवूडमध्ये पाकिस्तानी कलाकारांना स्थान दिले जाणार नाही, त्यांची गाणीही भारतात रिलीज केली जाणार नाहीत, अशी घोषणा यावेळी करण्यात आल्या. तसेच दोन तास संपूर्ण फिल्मसिटीचे काम थांबवून चित्रपट आणि टीव्ही इंडस्ट्रीशी जोडलेल्या सेलिब्रेटिंनी काळा दिवसही पाळला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 18, 2019 1:59 pm

Web Title: t series takes down rahat fateh ali khan and atif aslam songs from youtube
Next Stories
1 Pulwama Attack: ‘चार दिवस सगळे रडतील नंतर शहीदांना विसरतील’
2 ‘ही’ अभिनेत्री साकारणार पंतप्रधान मोदींच्या आईची भूमिका
3 Video : ‘गली बॉय’च्या अभिनयाची छाप विल स्मिथवर
Just Now!
X