News Flash

अनुराग- तापसीने केली चित्रीकरणाला सुरुवात? अनुरागचं नवं ट्विट चर्चेत

दिग्दर्शक अनुराग कश्यप आणि अभिनेत्री तापसी पन्नू यांच्यावर सध्या आयकर विभागाची कारवाई सुरु आहे

अनुराग कश्यप व तापसी पन्नू. (संग्रहित छायाचित्र)

अभिनेत्री तापसी पन्नू आणि दिग्दर्शक अनुराग कश्यप यांच्यासह त्यांच्या संबंधितांच्या मालमत्तेवर आयकर विभागाने छापे टाकले आहेत. मुंबई आणि पुण्यातल्या 30 ठिकाणी हे छापे टाकण्यात आले. या प्रकरणी अनुराग आणि तापसी यांची चौकशी सुरु आहे. अशातच काही वेळापूर्वी अनुराग केलेल्या एका ट्विटमुळे सोशल मीडियावर बरीच चर्चा सुरु आहे.

अनुराग आणि तापसीवर कर चोरीप्रकरणी ही कारवाई होत असल्याचं आयकर विभागानं सांगितलं. अनुरागच्या फैंटम फिल्म्स या प्रॉडक्शन हाऊसच्या संबंधित सर्वांना आयकर विभागानं ताब्यात घेतलं आहे आणि त्यांची चौकशी सुरु आहे. पण नुकताच अनुरागने आपल्या ट्विटर अकाऊंटवर एक फोटो पोस्ट केला आहे.

यात तापसी आणि अनुराग एकत्र दिसत आहेत. तसंच त्यानं या फोटोला “And we restart our shoot #DoBaaraa असं कॅप्शनही दिलं आहे. त्यातून असं लक्षात येत आहे की, त्यांनी शूटिंगला पुन्हा सुरुवात केली आहे.

मात्र, कशाचं शूटिंग, कशाबद्दल ही पोस्ट आणि हा फोटो आहे हे मात्र अद्याप समोर आलेलं नाही. आयकर विभागाची कारवाई पूर्ण झाली आहे का, जर नसेल झाली तर कारवाई सुरु असताना या दोघांनी चित्रपटाच्या शूटिंगला कशी सुरुवात केली, हे चित्रपटाचंच शूटिंग आहे ना असे अनेक प्रश्न इथं उपस्थित होत आहेत.

नुकतंच तापसीने या कारवाईसंदर्भात “मी एवढी स्वस्त नाही” असं ट्विट केलं. त्यावर अभिनेत्री कंगना रणौतने तिला “तू नेहमीच स्वस्त राहशील” असा टोला लगावला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 6, 2021 2:49 pm

Web Title: taapsee and anurag started shooting again vsk 98
Next Stories
1 ‘डोन्ट टच मी’ म्हणत, जॉनी लिव्हरने केला मुली सोबत डान्स
2 नवाजुद्दिनची पत्नी म्हणते, आता घटस्फोट नको……
3 “तू नेहमीच स्वस्त राहशील”, आयकराच्या कारवाईवर कंगनाचा तापसीला टोला
Just Now!
X