06 August 2020

News Flash

तापसीचं ‘मिशन डेटींग’ सुरु, करते याला डेट

ती व्यक्ती फिल्म इंडस्ट्रीमधील नसून इतर कुणीतरी आहे

बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू बी-टाऊनमधील सध्याची लोकप्रिय अभिनेत्री आहे. स्पष्ट व्यक्तव्यामुळे चाहत्यांच्या मनावर राज्य करणारी तापसी मात्र खासगी आयुष्याबद्दल नेहमीच मौन बाळगते. काही दिवसांपूर्वी तापसीचा ‘मिशन मंगल’ चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिवर चांगली कमाई केली. आता तापसीचे मिशन डेटींग सुरु असल्याच्या चर्चा सुरु आहेत.

तापसीने एका मुलाखतीमध्ये ती रिलेशनशीपमध्ये असल्याचे कबूल केले होते. तापसीची बहिण शगुनने त्या दोघांची भेट घालून दिली असल्याचे तिने सांगितले होते. इतकेच नव्हे तर ती व्यक्ती फिल्म इंडस्ट्रीमधील नसून इतर कुणीतरी असल्याचा खुलासा देखील तापसीने केला होता. आता तापसी डेट करत असलेल्या व्यक्तीचे नाव समोर आले आहे. चाहत्यांसाठी हा सुखद धक्काच आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तापसी एका बॅडमिंटनपटूला डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. त्याचे नाव मिथअस बोय असे असून तो डेन्मार्क येथे राहणारा आहे. मिथअसने २०१२च्या समर ऑलिम्पिक बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरीत रौप्य पदक जिंकले होते.

योग्य वेळ पाहून तापसी लग्नबंधनात अडकणार आहे. तिच्या लग्नसोहळ्यात कुटूंबीय आणि जवळच्या मित्रपरिवाला आमंत्रण देण्यात येणार आहे. दरम्यान लग्नाचे सगळे विधी एका दिवसात पार पाडण्यात येणार असल्याचे तापसीने एका मुलाखतीदरम्यान सांगितले आहे.

तापसी अनुभव सिन्हाच्या ‘थप्पड’ चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात ती अमृता प्रीतम यांची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाल्याचे तापसीने सोशल मीडियावर फोटो शेअर करत सांगितले आहे. तसेच तापसीचा लवकरच ‘सांड की ऑंख’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात तापसी भूमि पेडणेकरसह दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन तुशार हिरानंदानीने केले असून २५ ऑक्टोबर रोजी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 18, 2019 8:39 am

Web Title: taapsee pannu affair with badminton player avb 95
Next Stories
1 मेडिकल कॉलेजमधल्या सांस्कृतिक चळवळी
2 सोशल मीडियावर मनोज बाजपेयीच्या ‘द फॅमिली मॅन’ची चर्चा
3 ”..तर त्यांनीच माझ्याकडे यावं”, हॉलिवूड पदार्पणाबाबत नवाजुद्दीनचं विधान
Just Now!
X