20 November 2019

News Flash

तापसी का तापली? चाहत्याच्या कानशिलात लगावत दिली फोन तोडण्याची धमकी

'फोटो डिलीट कर नाहीतर फोन तोडून टाकेन,' अशी धमकीच तिने त्या मुलाला दिली. 

तापसी पन्नू

अभिनेत्री तापसी पन्नू तिच्या दमदार अभिनयासोबतच बेधडक स्वभावासाठी ओळखली जाते. ‘मनमर्जियाँ’ चित्रपटात तिने अशाच एका बेधडक तरुणीची भूमिका साकारली होती. एखादी भूमिका साकारल्यानंतर ९० टक्के मी त्यातून बाहेर पडते पण १० टक्के त्या भूमिकेचा अंश माझ्यात राहतो, असं तापसी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत म्हणाली. अशातूनच घडलेला एक किस्सासुद्धा तिने सांगितला.

‘मनमर्जियाँ’च्या शूटिंगदरम्यान तापसी तिच्या बहिणीसोबत बाहेर जेवायला गेली होती. जेवून निघाल्यावर तापसी फुटपाथवर उभी राहून तिच्या ड्राइव्हरची वाट पाहत होती. त्यावेळी एक मुलगा बाइकवरून तिच्या जवळ आला आणि तापसीला न विचारताच त्यानं तिच्यासोबत सेल्फी घेण्याचा प्रयत्न केला. हे पाहून तापसीचा पारा चढला. त्यावेळी ‘मनमर्जियाँ’मधील रुमीच्या भूमिकेचा तिच्यावर इतका परिणाम झाला होता की तिनं त्या मुलाच्या कानाखाली मारली. इतकंच नव्हे तर तिने त्या मुलाकडून फोन काढून घेतला व त्यातील फोटो डिलीट करायला सांगितला. ‘फोटो डिलीट कर नाहीतर फोन तोडून टाकेन,’ अशी धमकीच तिने त्या मुलाला दिली.

वाचा : रितेशच्या फोटोवर कमेंट करताच जेनेलिया सिद्धार्थ जाधवला म्हणाली..

एखादी भूमिका करताना कलाकार स्वत:ला त्यात पूर्णपणे झोकून देत असतो. अशा वेळी त्या भूमिकेचा थोडातरी परिणाम कलाकारावर नक्की होतो असं तापसी म्हणते. तिचा नुकताच ‘गेम ओव्हर’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. हा एक सायकोलॉजिकल थ्रिलर चित्रपट असून बॉक्स ऑफीसवर त्याने जेमतेम कमाई केली. याव्यतिरिक्त तापसी ‘सांड की आँख’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे.

First Published on June 25, 2019 5:23 pm

Web Title: taapsee pannu blasts a man clicking pictures without her permission ssv 92
Just Now!
X