27 February 2021

News Flash

पूर्वकल्पना न देता ‘पती, पत्नी और वो’च्या रिमेकमधून तापसीची गच्छंती

माझी चित्रपटातून गच्छंती का झाली याचं मला उत्तर हवं आहे असं म्हणत तापसीनं नाराजी व्यक्त केली आहे.

बॉलिवूडमधल्या ऐंशीच्या दशकातील हिट चित्रपट ‘पती,पत्नी और वो’ चा रिमेक प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे या चित्रपटासाठी अभिनेत्री तापसी पन्नूची वर्णी लागली होती. तापसीनं चित्रीकरणासाठी काही तारखाही उपलब्ध करून दिल्या होत्या. मात्र ऐनवेळी तापसीची कोणतीही पूर्वकल्पना न देता चित्रपटातून गच्छंती करण्यात आली आहे. तापसीनं या सर्व कारभारावर नाराजी व्यक्त केली आहे.

‘दिग्दर्शक मुदस्सर अजीज यांनी कोणतीही पूर्वकल्पना न देता मला या चित्रपटातून वगळलं. पटेल असं एकही कारण त्यांनी मला दिलं नाही. निर्मात्यांकडे विचारलं असता त्यांनीही स्पष्टीकरण द्यायला नकार दिला. माझी चित्रपटातून गच्छंती का झाली याचं मला उत्तर हवं आहे’ असं म्हणत तापसीनं एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत आपली नाराजी व्यक्त केली आहे.

या चित्रपटात अर्जुन कपूर, सोनाक्षी सिन्हा हे देखील प्रमुख भूमिकेत आहेत. तापसीची गच्छंती केल्यानंतर तिच्या जागी अनन्या पांडेची वर्णी लागली असल्याचं समजत आहे. अनन्या ‘स्टुडंट ऑफ द इअर २’ मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 17, 2019 1:58 pm

Web Title: taapsee pannu dropped from pati patni aur woh remake
Next Stories
1 Video : ‘लकी’मधील ‘कोपचा’ गाण्यावर जितेंद्र यांचा हटके डान्स
2 ‘३८ वर्षानंतर नवऱ्यासोबत डेटवर गेलात, तर हे असं होणारंच’
3 …म्हणून भूमि पेडणेकरनं स्वत:ला ४५ दिवस खोलीत घेतलं होतं कोंडून !
Just Now!
X