तापसी पन्नू, अनुराग कश्यप आणि त्यांच्या इतर साथीदारांवर आयकर विभागाने ३ मार्चपासून छापे टाकण्यास सुरूवात केली होती. यासर्वांनी फॅंटम फिल्म्स सुरू केली होती. ही कंपनी आता सध्या बंद आहे. रिलायन्स एंटरटेनमेंट समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिबशीष सरकार, सेलिब्रिटी आणि टॅलेंट मॅनेजमेंट कंपन्या केडब्ल्यूएएन आणि एक्झीडच्या काही अधिकाऱ्यांचादेखील यात समावेश होता. मुंबई आणि पुण्यातील ३० ठिकाणी छापे टाकण्यात आले.

आयकर विभागाने छापे टाकल्यानंतर पहिल्यांदाच अभिनेत्री तापसी पन्नू हिने ट्वीट केले आहे.

ट्विटरवर लिहिताना तिने म्हटले आहे  की, “३ दिवसांच्या शोधात प्रामुख्याने ३ गोष्टींचा समावेश आहे. १. पॅरिसमधील माझ्या मालकीचा असलेला ‘कथित’ बंगला कारण की, उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू होणार आहेत. २. मी याआधीच नाकारलेल्या ५ कोटी रकमेची “कथित” पावती. ३ सन्माननीय अर्थमंत्र्यांनी दिलेल्या वृत्तानुसार २०१३ मधील माझ्यावर टाकलेल्या छापाची आठवण. ”

वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी शुक्रवारी सांगितले होते की २०१३ मध्येही त्याच व्यक्तींवर छापे टाकण्यात आले होते, परंतु त्यावेळी या गोष्टीची काहीच चर्चा झाली नाही. सध्याच्या परिस्थितीत हा खुप मोठा चर्चेचा विषय बनला आहे. राजकीय नेत्यांनी, सेलेब्रिटींनी, राहुल गांधी आणि शिवसेनेने सुध्दा या छाप्याबद्दल प्रतिक्रिया दिली होती.

आयकराच्या कारवाईवर तापसी पन्नूच्या प्रियकराचं केंद्रीय मंत्र्यांना ट्विट; उत्तर मिळालं की…

काही भारतीय खेळाडूंना प्रशिक्षण देणारा तापसी पन्नूचा प्रियकर मॅथियस बोई याने केंद्रीय क्रीडा मंत्री किरेन रिजिजू यांनी ट्विट केलं होते. घरामध्ये उगाच तणाव निर्माण झालं असल्याचं म्हटलं होतं. त्याच्या या ट्विटला किरेन रिजिजू यांनी उत्तर दिलं आणि आपल्या कर्तव्यासोबत एकनिष्ठ राहण्याचा सल्ला दिला आहे.