22 September 2020

News Flash

‘मला तो अवयव सर्वाधिक आवडतो’, तापसीच्या उत्तराने नेटकरीही गोंधळले

तापसी पन्नूचं ते सडेतोड उत्तर २४ तासांत गुगलवर सर्वाधिक सर्च

अभिनेत्री तापसी पन्नू

अभिनेत्री तापसी पन्नू तिच्या बेधडक भूमिकांसोबतच सडेतोड वक्तव्यांसाठीही प्रसिद्ध आहे. ‘पिंक’, ‘बेबी’, ‘नाम शबाना’ या चित्रपटांमध्ये तिने ज्याप्रकारे धाडसी भूमिका साकारल्या. त्याचप्रकारे खऱ्या आयुष्यातही आपण हजरजबाबी, साहसी असल्याचं तापसीने सिद्ध केलं आहे. सोशल मीडियावर अश्लिल कमेंट करणाऱ्याला तिने सडेतोड उत्तर दिलं असून तिच्या उत्तरातील एक शब्द गुगलवर सर्वाधिक सर्च केलं गेलं.

‘मला तुझ्या शरीराचे अवयव आवडतात,’ अशी कमेंट एका ट्विटर युजरने तापसीला केली. त्यावर तापसीने रोखठोक उत्तर दिलं. ‘अरे वाह! मला पण आवडतात. पण तुम्हाला कोणता आवडतो, मला ‘सेरेब्रम’ आवडतो,’ असं उत्तर देत तापसीने त्या व्यक्तीचं तोंडच बंद केलं. तापसीने दिलेलं हे उत्तर चर्चेत आलं आणि तिच्या ट्विटमधील ‘सेरेब्रम’ म्हणजे काय असा प्रश्न अनेकांना पडला.

वाचा : ‘झिरो’ फ्लॉप झाला तर पुढे काम मिळणं कठीण; शाहरुखला सतावतेय चिंता

‘सेरेब्रम’ म्हणजे मोठा मेंदू. हा शब्द त्यावेळी २४ तासांत गुगलवर सर्वाधिक सर्च केलं गेलं. एका नेटकऱ्याने गुगल सर्चचा स्क्रिनशॉट शेअर करत तापसीला टॅग केलं. नेटकऱ्यांनी तापसीच्या या उत्तराचं कौतुकसुद्धा केलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 19, 2018 3:18 pm

Web Title: taapsee pannu epic reply to a sexist troll increased the google search for cerebrum
Next Stories
1 रोहित शेट्टी म्हणतोय…. म्हणून साराला दिलं ‘सिम्बा’मध्ये काम
2 लग्नातील उरलेलं अन्न वाया न घालवता कपिलनं ते गरीबांना केलं दान
3 ‘झिरो’ फ्लॉप झाला तर पुढे काम मिळणं कठीण; शाहरुखला सतावतेय चिंता
Just Now!
X