लाल रंगाचा ड्रेस परिधान केलेल्या आणि वरातीतील मुलीप्रमाणे सजलेल्या एका बॉलीवूड अभिनेत्रीने अनोळखी व्यक्तिंच्या लग्नात पोहचून तेथे उपस्थित सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून पिंक चित्रपटातील अभिनेत्री तापसी पन्नू ही होती.

झालं असं की, मुंबईतील एक हॉटेलमध्ये नवरी मुलीच्या आई-वडिलांना काहीही कल्पना न देता भारतीय पोशाखात नटलेली तापसी पन्नू अचानक तेथे पोहचली. त्यानंतर नवरा-नवरीसहित उपस्थित सर्वच लोक आश्चर्यचकित झाले. लग्नासाठी उपस्थित सर्व माणसं संगीत सेरेमनीचा आनंद लुटत होती. त्यात अचानक तापसीच्या असं सजून येण्याने सर्वांनाच धक्का बसला होता. तापसीने कार्यक्रमातील संगीत बंद करून सगळ्यांचे लक्ष तिच्याकडे वेधले आणि कार्यक्रमात अशा पद्धतीने येण्याचा तिचा उद्देश सांगितला. ते ऐकून वधू-वरासह सगळेच चकित झाले. सर्व पाहुणे एका ठिकाणी जमल्यानंतर तापसीने तिची आणि अभिनेता अमित सध याची मुख्य भूमिका असलेल्या आगामी ‘रनिंग शादी डॉट कॉम’ चित्रपटाबद्दल सांगितले. इतकेच नाही तर या चित्रपटातील गाण्यावर नाचण्यासाठी तिने सर्व पाहुण्यांना आमंत्रित देखील केले. ‘रनिंग शादी डॉट कॉम’ मधील ‘डिंपी दे नाल भागे बंटी’ असे बोल असलेले हे पहिलेवहिले गाणे आहे. गेल्याच आठवड्यात प्रदर्शित करण्यात आलेल्या या गाण्यास आतापर्यंत वीस लाखांपेक्षाही अधिकवेळा  पाहिले गेले आहे. प्रसिद्ध पंजाब गायक लाभ जंजुआने गायलेले हे गाणे आहे. या गाण्यावर सर्वच पाहुण्यांनी नंतर ठेका धरला.

taapsee-pannu-promotes-musoi-of-runningshaadi-at-a-real-sangeet-ceremony1

अशा प्रकारे आपल्या चित्रपटाची आणि गाण्याची प्रसिद्धी करण्याबद्दल तापसी म्हणाली की, ही कल्पना सत्यात उतरविण्यासाठी मी खूप खूश होते. पण त्याचवेळी मला थोडी भीतीदेखील वाटत होती. आपल्याच चित्रपटातील पहिल्या गाण्यास ख-याखु-या लग्न सोहळ्यात वाजवून त्यावर सर्वांना नाचायला लावणे याहून कोणतीच गोष्ट खास असू शकत नाही. अचानक मी संगीत सेरेमनीत जाण्याची जोखीम पत्करली. पण, तेथे उपस्थित असलेल्या सर्व पाहुण्यांनी माझे आनंदात आणि उत्साहात स्वागत करून मलाच चकित केले. पुढे ती म्हणाली की, नवरा आणि नवरी या दोघांनाही माझ्या जाण्याची माहिती नव्हती. तसेच, त्यामागचे कारणही त्यांना ठाऊक नव्हते. त्यामुळेच त्यांच्या चेह-यावरचे हावभाव पाहणे सगळ्यात जास्त मजेशीर राहिले. त्यांच्या चेह-यावरचे भाव पाहण्यासारखे होते. त्यानंतर तेथे उपस्थित सर्व पाहुण्यांनी माझ्या चित्रपटातील गाण्यावर डान्स केला. ते एक गुजराती लग्न होते. पण त्यांनी ज्याप्रकारे पंजाबी गाण्यावर ठेका धरला ते पाहण्यासारखे होते. हा दिवस आयुष्यभर माझ्या लक्षात राहिल.

taapsee-pannu-with-the-to-be-bride-and-groom-along-with-the-guests-to-promote-the-musif-running-shaadi1

taapsee-with-the-guests-at-the-sangeet-ceremony-11