News Flash

Game Over teaser : तापसीला लागलंय गेमिंगचं वेड

'गेम ओव्हर' हा एक थरारपट आहे

‘पिंक’, ‘मनमर्जियाँ’, ‘मुल्क’ यांसारख्या चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री तापसी पन्नूचा तेलुगू चित्रपट ‘गेम ओव्हर’ लवकरच प्रदर्शित होणार आहे. नुकताच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट तमिळसह हिंदी आणि तेलुगू या दोन भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अश्विन सरवनन करणार असून हिंदीमध्ये अनुराग कश्यप सादर करणार आहे. टीझर पाहून चाहत्यांमध्ये चित्रपटाची उत्सुकता वाढली आहे.

अनुराग आणि तापसीने या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झालाचे ट्विटरद्वारे सांगितले. टीझरमध्ये तापसीला घरात कैद करुन ठेवण्यात आले आहे. तसेच तिच्या भोवती व्हिडिओ गेम सुरु असल्याचे देखील दिसत आहे. टीझरमध्ये तापसी घाबरलेली आणि तिच्या भीतीवर विजय मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे. संपूर्ण टीझरमध्ये तापसीला महत्व देण्यात आले आहे. यावरुन असे स्पष्ट होते की चित्रपटाची संपूर्ण कथा ही तापसी आणि व्हिडिओ गेम भोवती फिरत आहे.

‘गेम ओव्हर’ हा एक थरारपट आहे. या चित्रपटाच्या टीझरमध्ये अंगावर काटे येतील असे काही सीन दाखवण्यात आले आहेत. ‘मी या चित्रपटाला हिंदीमध्ये सादर करण्यासाठी फार उत्सुक आहे. या चित्रपटाने पुन्हा एकदा ही गोष्ट सिद्ध केली आहे की दाक्षिणात्य चित्रपटांच्या निर्मितीचा दर्जा उच्चकोटीचा असतो. दिग्दर्शक अश्विन सरवननने सगळ्या सीमा भेदून दोन वेगळ्या शैली एकत्र करून हा सुंदर चित्रपट बनवला आहे’ असे अनुराग कश्यपने म्हटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 15, 2019 7:07 pm

Web Title: taapsee pannu game over movie teaser release
Next Stories
1 या प्रसिद्ध अभिनेत्रीला करायचंय विकी कौशलशी लग्न
2 किसिंग सीनबद्दल विचारल्याने शाहिद पत्रकारावर चिडला
3 अमेय म्हणतोय.. ‘मी ‘गर्लफ्रेंड’ पटवणार’
Just Now!
X