31 October 2020

News Flash

तापसीच्या आजीचं निधन; लॉकडाउनमुळे झालं नाही अंतिम दर्शन

तापसी मुंबईत अडकली आहे

तापसी पन्नू

देशावर करोना विषाणूचं संकट असल्यामुळे देशातील जनता आधीच त्रस्त झाली आहे. सामान्य जनतेपासून सेलिब्रिटींपर्यंत प्रत्येक जण या समस्येमुळे हैराण झाला आहे. त्यातच अभिनेत्री तापसी पन्नूने तिच्या जवळची व्यक्ती गमावली आहे. तापसीच्या आजीचं निधन झालं असून तापसीने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत ही माहिती दिली.

देशात लॉकडाउन सुरु असल्यामुळे तापसी मुंबईत अडकली आहे. त्यामुळे तिला आजीचं शेवटचं दर्शनही घेता आलं नाही. याचं दु:ख तिने सोशल मीडियावर व्यक्त केलं आहे. तिने आजीचा एक फोटो शेअर करत आयुष्यात पोकळी निर्माण झाल्याचं म्हटलं आहे.

 

View this post on Instagram

 

The last of that generation in the family leaves us with a void that will stay forever…. Biji

A post shared by Taapsee Pannu (@taapsee) on

“माझी बीजी आज सोडून गेली. आमच्या मनात एक मोठी पोकळी निर्माण करुन तू गेलीस. तू कायम आमच्या हृदयात राहशील. बीजी”, असं कॅप्शन तापसीने या फोटोला दिलं आहे. दरम्यान, ही दु:खद वार्ता समजल्यानंतर कलाविश्वातील अनेकांनी तापसीचं सांत्वन केलं आहे. तर अनेकांनी तिच्या आजीला श्रद्घांजली अर्पण केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 31, 2020 9:27 am

Web Title: taapsee pannu grandmother passes away actress ssj 93
Next Stories
1 जगातल्या सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थांचं G7 शिखर संमेलन लांबणीवर; ट्रम्प देणार भारतालाही निमंत्रण
2 Mann ki baat Live Update : माय लाईफ, माय योग; मोदींनी केली स्पर्धेची घोषणा
3 दिल्लीतील सर्वात मोठ्या कोविड रुग्णालयाचे संचालक, ‘यूसीएमएस’ रुग्णालयाचे अधिष्ठाता करोना पॉझिटिव्ह
Just Now!
X