News Flash

‘हसीन दिलरुबा’साठी पहिली चॉईस नव्हती तापसी पन्नू… ; समोर आली नवी माहिती

म्हणाली, " निश्चितच या चित्रपटाच्या भूमिकेसाठी मी परफेकट बसत नव्हती आणि आम्हा सर्वांना रिस्क घेणं फार आवडतं."

सस्पेन्स आणि थ्रीलरने रंगलेल्या प्रेमाच्या विविध छटा पडद्यावर दाखवण्यासाठी अभिनेत्री तापसी पन्नू आणि अभिनेता विक्रांत मेस्सी यांचा आगामी चित्रपट ‘हसीन दिलरुबा’ बराच चर्चेत आलाय. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर देखील प्रदर्शित झालाय. ट्रेलर पाहिल्यावर चाहत्यांमध्ये चित्रपटाबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचलेली असतानाच या चित्रपटाबाबत नव नवे खुलासे समोर येत आहेत. या चित्रपटातील अभिनेत्री तापसी पन्नूने एक नवा खुलासा केलाय.

‘हसीन दिलरुबा’साठी मी पहिली चॉईस नव्हती, असा खुलासा स्वतः अभिनेत्री तापसी पन्नूने केलाय. या चित्रपटासाठी इतर अनेक अभिनेत्रींचे पर्याय होते. पण हे सर्व पर्याय संपल्यानंतर अखेरला तिची निवड करण्यात आल्याचं तिने सांगितलं. यावेळी अभिनेत्री तापसी पन्नू म्हणाली, “ज्यावेळी मी लेखिका कनिका ढिल्लोंकडून या चित्रपटाबद्दल ऐकलं तेव्हाच हा चित्रपट माझ्या मनात बसला होता. दुर्दैवाने या चित्रपटासाठी मी पहिली चॉईस नव्हती. पण शेवटा हा चित्रपट मलाच मिळाला. कारण त्यांच्यासमोर असलेले इतर अभिनेत्रींचे पर्याय संपले होते.”

अभिनेत्री तापसी पन्नूने तिच्या या चित्रपटाला कलाकारांच्या ‘हातातली कॅण्डी’ असं म्हटलंय. यापुढे बोलताना तिने सांगितलं, “जुने लोक बोलून गेले आहेत, जर एखादी गोष्टी तुमच्यासाठी बनलेली असेल तर ती तुम्हाला मिळतेच. हेच माझ्या या चित्रपटाच्या बाबतीत घडलंय. या चित्रपटात अतिशय सुंदरतेने कहाणी लिहिलेली आहे. यात अद्भूत पात्र आहेत.”

अभिनेत्री तापसी पन्नू पुढे म्हणाली, “मला फार आनंद होतोय की माझ्या लूक आणि प्रदर्शनात वेगवेगळे प्रयोग करण्याची संधी मिळाली. कारण निश्चितच या चित्रपटाच्या भूमिकेसाठी मी परफेकट बसत नव्हती आणि आम्हा सर्वांना रिस्क घेणं फार आवडतं.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Taapsee Pannu (@taapsee)

या चित्रपटात अभिनेता विक्रांत मेस्सी आणि हर्षवर्धन राणे सुद्धा आहे. या चित्रपटात एक अशा महिलेची कहाणी आहे, जी तिच्या पतीसोबत सुखी नसते आणि काही दिवसातंच तिच्या पतीची हत्या होते आणि यात ती अडकते.

अभिनेता विक्रांत मेस्सीनेही या चित्रपटात हास्य, विचित्रता, सूड आणि रोमान्स या सर्व भावनांचं मिश्रण असल्याचं म्हटलंय. याबद्दल सांगताना अभिनेता विक्रांत मेस्सी म्हणाला, “मला आशा आहे की हा चित्रपट सर्वांना तितकाच आश्चर्य करून टाकणारा ठरेल जितका सुरवातीला चित्रपटाची कथा ऐकून मी आश्चर्य झालो होतो. या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान रोमांचक अनुभव होता.”

त्याचबरोबर अभिनेता हर्षवर्धन राणे याने सुद्धा या चित्रपटात देशातील प्रतिभावान व्यक्तींसोबत फ्रेम शेअर करताना सन्मानित वाटत असल्याचं सांगितलं. तो म्हणाला, “तापसी आणि विक्रांत या दोघांमध्ये एका गोष्टीचं साम्य आहे, ते म्हणजे त्या दोघांना कुणीच कधी समजू शकणार नाही. कधी ते मजा मस्ती करताना दिसतील तर कधी ते गंभीर बनतील…मला त्यांचे विनोद समजून घ्यायला आधी खूप छोट्या छोट्या गोष्टी पहाव्या लागतात.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Taapsee Pannu (@taapsee)


‘हसीन दिलरुबा’ हा एक मिस्ट्री थ्रिलर आहे. येत्या २ जुलै रोजी हा चित्रपट नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन विनील मॅथ्यू यांनी केले आहे. आनंद एल राय आणि हिमांशु शर्मा हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. या चित्रपटाचा ट्रेलर पाहून प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबाबत उत्सुकता वाढली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 12, 2021 12:55 pm

Web Title: taapsee pannu says i was not first choice for film haseen dillruba prp 93
Next Stories
1 “चाहत्यांकडून पहिल्यासारखे प्रेम मिळत नाही..”, अमिताभ यांनी व्यक्त केली खंत
2 सुशांतची ‘ती’ इच्छा अपूर्णच राहिली; रेमो डिसूजाने केला खुलासा
3 कॉमेडियन मल्लिका दुआच्या आईचे करोनाने निधन
Just Now!
X