News Flash

तापसी पन्नू होणार नव्या घरात शिफ्ट, सोशल मीडियावर फोटो व्हायरल

तापसीने स्वत: सोशल मीडियावर फोटो शेअर केला आहे.

सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असणारी अभिनेत्री म्हणजे तापसी पन्नू. आता तापसी नव्या घरात शिफ्ट झाली असल्याचे समोर आले आहे. या नव्या घरातील फोटो तापसीने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तिच्या या घराचे नाव ‘पन्नू पिंड’ असे आहे.

तापसीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर नव्या घरातील फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करत तापसीने “२०२० या वर्षात हे अपार्टमेंट तयार करणे माझ्यासाठी आव्हानात्मक होते. अखेर आमचे ‘पन्नू पिंड’ हे घर तयार झाले आहेत” या आशयाचे कॅप्शन दिले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Taapsee Pannu (@taapsee)

पाहा फोटो : तापसीचे आलिशान घर आतुन पाहिलेत का?

तापसीने शेअर केलेल्या फोटोमध्ये तिने पांढऱ्या रंगाची साडी नेसली आहे. ती या लूकमध्ये सुंदर दिसत आहे. तसेच तापसीने घरात वूडन फर्निचर केले असल्याचे दिसत आहे. सध्या तापसीचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अनेकजण तिच्या या फोटोवर कमेंट आणि लाइक्सचा वर्षाव करत आहेत.

तापसी दिग्दर्शक अनुराग कश्यपच्या ‘दोबारा’ या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे सध्या चित्रीकरण सुरु आहे. तसेच रश्मी रॉकेट, शाब्बास मिथू, लूप लपेटा आणि हसीन दिलरुबा या चित्रपटात देखील ती मुख्य भूमिकेत दिसणार असल्याचे म्हटले जात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 12, 2021 11:30 am

Web Title: taapsee pannu shares a glimpse of her new house avb 95
Next Stories
1 ठरलं! ‘आदिपुरुष’मध्ये प्रभास-सैफसोबत दिसणार ही अभिनेत्री
2 राखी सावंतचं नवं खुळ, ‘नागीन’नंतर राखीचा नवा अवतार
3 अटकेविरोधात कंगना सत्र न्यायालयात
Just Now!
X