News Flash

तापसी पन्नूने थ्रोबॅक फोटो शेअर करताच बॉयफ्रेंडने केली कमेंट

सध्या तिचा हा फोटो चर्चेत आहे.

बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. ती सतत तिचे व्हिडीओ आणि फोटो शेअर करताना दिसते. तसेच ती बऱ्याच वेळा अनेक सामाजिक विषयांवर देखील बिनधास्तपणे तिचे मत मांडताना दिसते. नुकताच तापसीने सोशल मीडियावर शेअर केलेला थ्रोबॅक फोटो चर्चेत आहे. या फोटोवर तिच्या बॉयफ्रेंडने देखील कमेंट केली आहे.

तापसीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोवर तिचा बॉयफ्रेंड Mathias Boeने केलेल्या कमेंटने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्याने कमेंटमध्ये हार्ट असलेले इमोजी वापरले आहेत. हा फोटो शेअर करत तापसीने छान असे कॅप्शन दिले आहे. सध्या तापसीचा हा फोटो सोशल मीडियावर चर्चेत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Taapsee Pannu (@taapsee)

सोशल मीडियावर चर्चेत असणाऱ्या या फोटोमध्ये तापसीने राखाडी रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. तापसी या फोटोमध्ये अतिशय सुंदर दिसत आहे. चाहत्यांनी तिच्या या फोटोवर लाइक आणि कमेंटचा वर्षाव केला आहे.

तापसी गेल्या काही दिवसांपासून मॅथिअस बोएला डेट करत आहे. मॅथिअस बोए हा डेनमार्कचा अतिशय लोकप्रिय बॅडमिंटनपटू आहे. तापसी कुटुंबीयांच्या परवानगीने लग्न बंधनात अडकणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 4, 2021 1:49 pm

Web Title: taapsee pannu shares throwback photo boyfriend mathias reacts avb 95
Next Stories
1 राजकारणात प्रवेश करणार का? सोनू सूद म्हणतो…
2 Video : ‘त्या’ भांडणानंतर सलमानने घेतली राखीची बाजू, म्हणाला…
3 ‘कुली नं. १’वरुन ट्रोल करणाऱ्यांना वरुण धवनचे सडेतोड उत्तर, म्हणाला…
Just Now!
X