News Flash

युजरच्या ‘त्या’ कमेंटवर तापसी पन्नू भडकली; “मूर्खपणा कमी करा”

नेटकऱ्याला तापसीचं सडेतोड उत्तर

अभिनेत्री तापसी पन्नू सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. बॉलिवूडसह देशातील विविध घडामोडींवर ती तिचं मत मांडते. यामुळे बऱ्याचदा तापसीला ट्रोलदेखील व्हावं लागतं. नुकतच तापसीने सोशल मीडियावर नेटकऱ्याने विचारलेल्या एका प्रश्नावरून त्याला चांगलंच फटकारलं आहे. युजरच्या एका कमेंटवरून तापसीने त्याला फटकारताच या नेटकऱ्यांने त्याची कमेंट डिलीट करून टाकली.

गेल्या काही दिवसांपासून तापसी तिच्या ट्विटर अकाऊंटवरून करोनाशी संबंधित पोस्ट शेअर करत आहे. तसचं रुग्णांसाठी मदतीचं आवाहन करणाऱ्या किंवा मदत करणाऱ्या अनेक पोस्ट ती रीट्विट करत आहे. यातच एका युजरने तापसीच्या एका ट्विटवर कमेंट केली. या युजरने तापसीला तिने तिची महागडी कार मदतीसाठी द्यावी अशी कमेंट केली होती. “तुझी कार दे पन्नू. सर्व कामं ट्विटरवरूनच करणार आहे का? असा सवाल या युजरने केला होता. या कमेंटवर तापसीने युजरला सडेतोड उत्तर दिलं आहे.

युजरवर तापसी संतापली

तापसी युजरला म्हणाली, ” तुम्ही जरा गप्प बसू शकता का? एकदम गप्प ? जर तुम्हाला अशा वेळी हे सर्व बोलायचंय तर जरा संयम राखा, देशाला पुन्हा मोकळा श्वास घेऊ द्या आणि मग तुमची फालतू बडबड सुरू करा. तोपर्यंत माझ्या टाइमलाईनवर तुमचा मूर्खपणा दाखवू नका. मी जे करतेय ते मला करू द्या.” तापसीच्या या पोस्टनंतर अनेकांनी तिला पाठिंबा दिला आहे. तर ट्रोलरने देखील तापसीने फटकारल्यानंतर त्याची कमेंट डिलीट केली.

तापसी लवकरच ‘रश्मि रॉकेट’, ‘हसीना दिलरुबा’ आणि ‘शाबास मिठ्ठू’ या सिनेमांमधून झळकरणार आहे. सध्या करोनाच्या वाढत्या प्रादूर्भावामुळे तापसीच्या सर्व सिनेमांचं शूटिंग रद्द करण्यात आलं आहे. ती कुटुंबासोबत वेळ घालवतेय.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 27, 2021 9:13 am

Web Title: taapsee pannu slams back who troll her to give her car to help said stop nonsense on my timeline kpw 89
Next Stories
1 अभिनेत्री हिना खानला करोनाची लागण, काही दिवसांपूर्वीच वडिलांचं झालं होतं निधन
2 ‘नोमॅडलॅण्ड’चे ऑस्करवर वर्चस्व
3 धकधक गर्लने घेतला करोना प्रतिबंधक लसीचा दुसरा डोस
Just Now!
X