News Flash

‘त्या’ एका दृश्यासाठी तापसीला सातवेळा कानाखाली खावी लागली

तापसीने सांगितला थक्क करणारा किस्सा

तापसी पन्नू बॉलिवूड सिनेसृष्टीतील आघाडिच्या अभिनेत्रींपैकी एक म्हणून ओळखली जाते. अलिकडेच प्रदर्शित झालेल्या ‘थप्पड’ या चित्रपटामुळे तिच्या लोकप्रियतेत कमालीची वाढ झाली. या चित्रपटात तिने केलेला अभिनय पाहून प्रेक्षकांसोबतच समिक्षक देखील थक्क झाले होते. विशेषत: या चित्रपटात जेव्हा तिला थप्पड लगावली जाते, त्यावेळी तिच्या चेहऱ्यावरील हावभाव कमालीचे होते. परंतु या एका सीनसाठी तिने तब्बल सात वेळा थोबाडीत खाल्ल्या होत्या.

तापसीने हिंदूस्तान टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत हा पडद्यामागचा आश्चर्यचकित करणारा किस्सा सांगितला. ती म्हणाली, “हा संपूर्ण चित्रपट त्या एका दृश्यावर आधारित आहे. त्यामुळे त्या दृश्यात जिवंतपणा येणं गरजेचं होतं. पहिल्या टेकमध्ये अभिनेता पावेलने जेव्हा मला थोबाडीत मारली तेव्हा मी दिलेले एक्सप्रेशन्स दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांना आवडले नव्हते. त्यामुळे आणखी दोन टेक झाले. तिसऱ्या टेकला ते ओके म्हणाले, परंतु माझेच एक्सप्रेशन्स मला स्वत:ला आवडले नव्हते. त्यामुळे आणखी काही टेक मी दिले. अखेर सातव्या टेकला हवे असलेले एक्सप्रेशन्स मला मिळाले. थोडक्यात काय तर त्या एका दृश्यासाठी मी तब्बल सात थोबाडीत खाल्ला.” असा अनुभव तापसीने सांगितला.

‘थप्पड’ हा चित्रपट स्त्रियांवर होणाऱ्या कौटुंबिक हिंसाचारावर आधारित आहे. तापसीच्या करिअरमधील हा सर्वोत्कृष्ट चित्रपट होता असे म्हटले जाते. या चित्रपटात तिच्यासोबत पावेल गुलाटी, दिया मिर्झा, राम कपूर, नैला ग्रेवाल यांसारख्या नामांकित कलाकारांनी काम केले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 1, 2020 5:15 pm

Web Title: taapsee pannu slap scene took 7 takes for thappad mppg 94
Next Stories
1 Video : नृत्य सादरीकरणातून नर्तकांनी दिला करोनाशी लढण्याचा संदेश
2 “…आणि मी शब्दहीन झाले”; लतादिदींनी पोस्ट केला ऋषी कपूर यांचा दुर्मिळ फोटो
3 ऋषी कपूर- इरफान खाननंतर बॉलिवूडला आणखी एक धक्का, प्रोड्यूसर्स गिल्डच्या CEOचे निधन
Just Now!
X