News Flash

फेअरनेस क्रीम ब्रॅण्डचे नाव ऐकताच बॉलीवूड अभिनेत्रीने नाकारला कार्यक्रम

मी गोरी असल्यामुळे मला काही चित्रपटांना मुकावे लागले आहे.

'पिंक' चित्रपटाने अभिनेत्री तापसी पन्नूला एक वेगळी ओळख मिळवून दिली.

बॉलीवूडमध्ये गेल्या वर्षी आलेल्या ‘पिंक’ चित्रपटाने अभिनेत्री तापसी पन्नूला एक वेगळी ओळख मिळवून दिली. त्यानंतर भलेही तिचा कोणताच नवा चित्रपट आला नसला तरी तापसी ब-यापैकी चर्चेत राहिली आहे. तिच्या अभिनयाची हर पद्धतीने प्रशंसा करण्यात आली आहे. महिला सक्षमीकरणावर चर्चा करणा-या पुरस्कार सोहळ्यांमध्ये आणि कार्यक्रमांमध्ये सध्या ती उपस्थिती लावत असल्याचे दिसते. याच विषयावर आधारित असलेल्या एका कार्यक्रमाला जाण्यास तापसीने नकार दिल्याचे समोर आले आहे. कार्यक्रमाचे आयोजन एक फेअरनेस क्रिम करत असल्याने तिने तिथे जाण्यास नकार दिल्याचे कळते.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जयपूरमध्ये होणा-या कार्यक्रमाला तापसी पन्नू उपस्थिती लावणार होती. या कार्यक्रमाचा उद्देश महिला सक्षमीकरण असा होता. तापसी तिथे महिलांशी जोडल्या गेलेल्या मुद्दयांवर चर्चा करणार होती. पण, जेव्हा तिला कार्यक्रमाच्या आयोजकांचे नाव कळले तेव्हा तिने कार्यक्रमात जाण्यास नकार दिला. कारण, ज्यावर ती स्वतः विश्वास ठेवत नाही अशा कोणत्याही गोष्टीचे समर्थन तिला करायचे नाही. अगदी शेवटच्या क्षणी नाव परत घेण्याबद्दल तिने माफीदेखील मागितली. याविषयी बोलताना तापसी म्हणाली की, मी अगदी शेवटच्या मिनिटाला हा निर्णय घेतला ते मला कळतंय. जेव्हा मला कार्यक्रमाचे नाव कळले तेव्हा मी हा निर्णय घेतला. मी गोरी असल्यामुळे मला काही चित्रपटांना मुकावे लागले आहे. गोरेपणाला मी कोणत्याही पद्धतीने प्रमोट करणार नाही.

तापसी लवकरच ‘रनिंग शादी.कॉम’ या चित्रपटात लवकरच झळकणार आहे. राइजिंग सन फिल्म आणि क्राउचिंग टाइगर मोशन पिक्चर्सची निर्मिती असलेल्या या चित्रपटात घरच्यांचा विरोध असलेल्या जोड्यांचे लग्न लावताना तापसी यात दिसेल. रोमान्स आणि कॉमेडीचा तडका असलेल्या या चित्रपटात तापसी पन्नू ही निम्मीची तर अभिनेता अमित सध हा टेक्निशियन सरबजीतच्या भूमिकेत दिसेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 2, 2017 6:05 pm

Web Title: taapsee pannu takes a stand against fairness creams says no to event
Next Stories
1 ‘लाईफ, लेडिज अॅण्ड मुव्हीज…’ अन् रणबीर-सैफच्या गप्पा
2 ‘बद्रीनाथ की दुल्हनिया’चा ट्रेलर प्रदर्शित
3 होय, मी गुपचूप लग्न केलंय- हुमा कुरेशी
Just Now!
X