News Flash

‘मुल्क’मध्ये ऋषी कपूरच्या सूनेच्या भूमिकेत तापसी

ऑक्टोबरमध्ये चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात होणार आहे.

ऋषी कपूर, तापसी पन्नू

‘पिंक’ चित्रपटात अभिनेत्री तापसी पन्नूचं दमदार अभिनय पाहायला मिळालं. या चित्रपटाच्या यशानंतर तापसीला अनेक चित्रपटांचे ऑफर्स येत आहेत. आधी दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्यानंतर तापसी बॉलिवूडकडे वळली आणि आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर तिने बॉलिवूडमध्ये वेगळं स्थान निर्माण केलं. सध्या ती ‘जुडवा २’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. यादरम्यानच तिने आणखी एक चित्रपट साईन केलाय.

या चित्रपटात तापसी ऋषी कपूर यांच्यासोबत भूमिका साकारणार असल्याची माहिती मिळतेय. अनुभव सिन्हा दिग्दर्शित या चित्रपटाचं नाव ‘मुल्क’ असं आहे. चित्रपटात तापसी ऋषी कपूर यांच्या सूनेच्या भूमिकेत दिसणार आहे. एका सत्य घटनेवर आधारित हा चित्रपट असून हा एक थरारपट असल्याचं म्हटलं जातंय. तापसीच्या पतीच्या भूमिकेत राज बब्बर यांचा मुलगा प्रतिक बब्बर दिसणार असल्याचं म्हटलं जात असून याबाबत अधिकृत माहिती अद्याप स्पष्ट झाली नाही.

Bhoomi Poster : रक्ताने माखलेला संजय दत्त

‘मुल्क’ या चित्रपटात एका संयुक्त कुटुंबाची कथा दाखवण्यात येणार आहे आणि हा कुटुंब भारताच्या एका छोट्याशा शहरात वास्तव्यास असतो. कुटुंबातील लोकांचा एका षडयंत्रात अडकण्यापासून त्यातून बाहेर पडून आपला सन्मान परत मिळवण्याचा प्रवास यातून दाखवण्यात येणार आहे. वाराणसी आणि लखनऊ येथे ऑक्टोबरमध्ये चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात होणार आहे. पुढच्या वर्षी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येण्याची शक्यता आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 29, 2017 7:45 pm

Web Title: taapsee pannu to play role of daughter in law of rishi kapoor in mulk
Next Stories
1 Bhoomi Poster : रक्ताने माखलेला संजय दत्त
2 आसाम आणि गुजरातमधील पूरग्रस्तांच्या मदतीला सरसावला आमिर खान
3 PHOTO : रामोजी राव यांच्या नातीचा शाही लग्नसोहळा