25 November 2020

News Flash

तापसीसोबत काम करण्यास कंगनाने दिला होता नकार, जाणून घ्या कारण

तापसीने एका मुलाखतीमध्ये हा खुलासा केला आहे.

काही दिवसांपूर्वी बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यप आणि निधी परमार यांचा ‘सांड की आँख’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात तापसी पन्नू आणि भूमि पेडणेकर या अभिनेत्री मुख्य भूमिकेत होत्या. नुकताच झालेल्या एका मुलाखतीमध्ये अनुरागने अभिनेत्री कंगना रणौतला चित्रपटात मुख्य भूमिका करण्याची इच्छा होती असे म्हटले होते. तर कंगनाने उत्तर देत अनुराग खोटे बोलत असल्याचे म्हटले. पण आता तापसीने यावर वक्तव्य केले आहे.

नुकताच तापसीने इंडिया टूडेला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये कोणतेही कारण नसताना वारंवार टीका करणाऱ्या कंगनासोबत कधी काम करायला आवडेल का या आशयाचा प्रश्न तापसीला विचारण्यात आला होता. त्यावर तापसीने, ‘आम्ही जवळपास एकत्र काम करणारच होतो. सांड की आँख चित्रपटसाठी निर्मात्यांनी कंगनाला ऑफर दिली होती. पण तिने चित्रपटाला नकार दिला. चित्रपटात दोन अभिनेत्री कशाला हव्यात. तुम्ही एका अभिनेत्रीसोबत चित्रपट करु शकता असे म्हणत कंगना म्हणाली होती. माझ्या चित्रपटाच्या दिग्दर्शकाने स्क्रिप्ट बदलण्यास नकार दिला’ असे तापसी म्हणाली.

‘मला अतिशय हुशार अशा को-स्टार्ससोबत काम करायला आवडते. मी पिंक, मिशन मंगल आणि सांड की आँखमध्ये काम केले आहे. मी गोष्टी चांगल्या होण्यासाठी त्यांच्याकडे सकारात्मक दृष्टीकोनातून पाहते’ असे तापसी पुढे म्हणाली.

अनुराग कश्पने एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीमध्ये ‘सांड की आँख चित्रपटाची स्क्रिप्ट जेव्हा कंगानाला दाखवण्यात आली तेव्ही ती म्हणाली चित्रपटाची कथा चांगली आहे. पण चित्रपटात दोन अभिनेत्री कशाला हव्यात? तुम्ही चित्रपटात एकाच अभिनेत्रीला घ्या असे कंगना म्हणाली होती. आताच्या चित्रपटात ती मुख्य भूमिकेत असते’ असे अनुराग म्हणाला होता. पण कंगनाने अनुराग खोटं बोलत असल्याचे सोशल मीडियाद्वारे म्हटले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 29, 2020 11:14 am

Web Title: taapsee pannu was to work with kangana ranaut in saand ki aankh reveals why kangana rejected it avb 95
Next Stories
1 करोनामुक्त झाल्यावर ‘कसौटी जिंदगी की २’फेम अभिनेत्याला पॅनिक अटॅक
2 सुशांत आत्महत्या प्रकरण : अटकपूर्व जामिनासाठी रिया चक्रवर्तीचे प्रयत्न सुरू
3 ‘जलता है वह खुद बुझ जाता है’; बिग बींची खास पोस्ट
Just Now!
X