News Flash

‘दर्या किनारी…’ गाण्यावर ‘तारक मेहता…’मधील दयाबेनचा कोळी डान्स व्हायरल, बोल्ड लूक पाहून चाहते थक्क

दिशा वकानीने गोल्डन रंगाचा स्कर्ट आणि बॅकलेस ब्लॉऊज परिधान केल्याचं पाहायला मिळतंय.

(photo-file/youtube)

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेने गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केलं आहे. या मालिकेतील जेठालाल आणि दया बेनच्या जोडीने तर लोकप्रियतेचा शिखर गाठला आहे. या शोमधील दयाबेन म्हणजेच अभिनेत्री दिशा वकानीने शोमधून ब्रेक घेतला असला तरी दिशा सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय आहे.

२०१७ सलामध्ये दिशा वकानीने ती गरदोर असल्याने ‘तारक मेहता…’ मालिकेतून ब्रेक घेतला. मात्र तीन वर्षांहून अधिक काळ लोटूनही दिक्षाने शोमध्ये पुनरागमन केलेलं नाही. त्यामुळे अनेक चाहते तिच्या पुनरागमनाची वाट पाहत आहेत. दयाबेनने शोमध्ये परत यावं यासाठी अनेक मीम्स बऱ्याचदा सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. मात्र सध्या दयाबेनचा एक डान्स सोशल मीडियावर चांगला व्हायरल होत आहे. मात्र यावेळी या व्हिडीओत दया बेन गरबा नव्हे तर कोळी डान्स करताना दिसून येतेय.

दयाबेन म्हणजेच अभिनेत्री दिशा वकानीचा हा व्हिडीओ बराच जुना असून सध्या मात्र तो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ ‘दर्या किनारे एक बंगलो…’ या कोळी गीताच्या अल्बमचा आहे. यात दिशाचा काहीसा बोल्ड लूक दिसून येतोय. दिशाने गोल्डन रंगाचा स्कर्ट आणि बॅकलेस ब्लॉऊज परिधान केल्याचं पाहायला मिळतंय.

हे देखील वाचा: दिशा पटानीचं बर्थ डे सेलिब्रेशन; टायगर आणि कृष्णा श्रॉफसोबत धमाल

हे देखील वाचा: सुशांत सिंह राजपूतच्या निधनामुळे ‘द फॅमिली मॅन’च्या जेके तळपदेचं स्वप्न राहिलं अपूर्ण

आजवर अनेकांनी दयाबेनला गरबा करताना पाहिलं असेल. मात्र तेवढ्याच उत्तम पद्धतीने दया बेन म्हणजेच दिशा कोळी गाण्यावर ठेका धरताना दिसत आहे. दिशाचा हा लूक पाहून अनेक चाहते थक्क झाले आहेत. तर अनेकांनी तिचं कौतुक केलं आहे. काही नेटकऱ्यांनी तर फिरकी घेत “जेठालालला सांगू का” अशा कमेंट केल्या आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 14, 2021 4:48 pm

Web Title: taarak mehata ka ooltah chashmah fame daya ben aka disha vakai koli dance backless blouse look goes viral kpw 89
Next Stories
1 गेल्या ४८ तासांपासूनची जगण्यासाठीची झुंज संपली; कन्नड अभिनेता संचारी विजय यांचं अपघाती निधन
2 Sushant Singh Rajput: हे चार प्रश्न अजूनही अनुत्तरीतच
3 “असा होता आमचा प्रवास”, ‘ते’ खास व्हिडीओ शेअर करत अंकिताने दिला सुशांतच्या आठवणींना उजाळा
Just Now!
X