News Flash

‘तारक मेहता…’मधील भिडे मास्तरांच्या सोनूचा व्हिडीओ व्हायरल, समुद्र किनारी निधि भानुशालीची धमाल

'तारक मेहता का उल्टा चश्मा' या शोमधील सोनू म्हणजेच निधि भानुशालीच्या फोटो आणि व्हिडीओला नेटकऱ्यांनी मोठी पसंती मिळताना दिसते

(Photo-Instagram@_ninosaur)

‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ या शोने गेल्या अनेक वर्षात प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केलंय. या शो मधील प्रत्येक कलाकाराने चाहत्यांच्या मनावर जादू केलीय. शोमधील कोणतही पात्र असो या प्रत्येक पात्राने प्रेक्षकांचं भरभरून मनोरंज केलंय. या शोमध्ये बालकराकारांची भूमिका साकारणारे कलाकार आता मोठे झाले आहेत. यातीलच एक म्हणजे लहानग्या सोनूची भूमिका साकारणारी अभिनेत्री निधि भानुशाली. निधि भानुशाली खूपच ग्लॅमरस झालीय. निधि सध्या जरी या शोचा भाग नसली तरी सोशल मीडियावर ती चांगलीच सक्रिय असते.

‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ या शोमधील सोनू म्हणजेच निधि भानुशालीच्या फोटो आणि व्हिडीओला नेटकऱ्यांनी मोठी पसंती मिळताना दिसते. निधिचा एक व्हिडीओ सोशल चांगला व्हायरल होतोय. निधि सध्या समुद्र किनाऱ्यावर फिरण्याची मजा लुटतेय. सुमुद्र किनारे आणि जंगलांमध्ये फिरण्याची निधिला आवड आहे. या व्हिडीओत निधि समुद्र किनाऱ्यावर तिच्या लाडक्या श्वानासोबत मजा करताना दिसतेय.

 

View this post on Instagram

 

A post shared by Nidhi Bhanushali (@_ninosaur)

हे देखील वाचा: “मी आता लिपस्किट पण नाही लावली”, म्हणत किरण खेर यांनी कॅमेरासमोर येण्यास दिला नकार

या व्हिडीओतील निधिचा हिप्पी अंदाज अनेकांच्या पसंतीस उरत आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये ती म्हणालीय, “सूर्यात्साचे विविध रंग..पावसाळ्यातील सुर्यास्त खूपच सुंदर असतो. ढगांच्या आड तो लपला जातो…आणि मग अंधार पडेपर्यंत आकाशात वेगवेगळ्या रंगांच्या छटा पाहायला मिळतात.” असं सूर्यास्ताचं वर्णन निधिने तिच्या कॅप्शनमध्ये केलंय. या आधी निधिने शेअर केलेल्या व्हिडीओत ती समुद्र किनारी दगडांमध्ये बसलेली असून आणि एका स्टोव्हवर जेवण बनवताना दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Nidhi Bhanushali (@_ninosaur)

हे देखील वाचा: करीना कपूरचा ड्रेस पाहून भडकला होता सैफ अली खान, म्हणला “आधी ते कपडे…”

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या शोमध्ये निधिने अनेक वर्ष भिडे मास्तरांची मुलीची म्हणजेच सोनूची भूमिका साकारली होती. शोमधील सोनू ते आत्ताची निधि यात मोठा बदल झालेला आहे. निधि आता चांगलीच बोल्ड आणि ग्लॅमरस झालीय. निधि भानुशालीला भटंकतीची प्रचंड आवड आहे. तिच्या या भटकंतीलमधील अनेक क्षण ती चाहत्यांसोबत शेअर करत असते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 27, 2021 11:23 am

Web Title: taarak mehata ka ooltah chashmah fame sonu aka nidhi bhanushali viral video from beach sunset kpw 89
Next Stories
1 RD Burman Birth Anniversary: प्ले लिस्टमध्ये असलीच पाहिजेत अशी पंचमदा यांची ही १० सदाबहार गाणी
2 “मी आता लिपस्किट पण नाही लावली”, म्हणत किरण खेर यांनी कॅमेरासमोर येण्यास दिला नकार
3 आर डी बर्मन यांच्या लग्नाच्या प्रपोजलला आशा भोसले यांनी आधी दिला होता नकार!