‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ हा शो गेल्या १३ वर्षांपासून प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करत आहे. या शोमधील सर्वच कलाकारांनी प्रेक्षकाची मोठी पसंती मिळवली आहे. या शोमधील प्रत्येक पात्र हे खास असून त्यांची एक वेगळी ओळख आहे. यातच आता या शोमधील अनेकांचं फेव्हरेट असं एक खास पात्र पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
गेल्या काही दिवसांपासून ‘तारक मेहता…’मधील अनेकांच्या आवडत्या अशा एका अभिनेत्रीने या शोमधून ब्रेक घेतला होता. मात्र आता मोठ्या ब्रेकनंतर ही अभिनेत्री पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. कदाचित अनेकांच्या डोक्यात दयाबेनचं नाव समोरं आलं असेल. मात्र पुनरागमन करणारी ही अभिनेत्री द्याबेन नसून रीटा रिपोर्टरची भूमिका साकारणारी अभिनेत्री प्रिया आहूजा आहे. प्रिया आहूजा पुन्हा एकदा ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या शोमध्ये एण्ट्री करतेय.
View this post on Instagram
‘तारक मेहता…’मधील रीटा रिपोर्टर हे पात्र चांगलंच लोकप्रिय ठरलं होत. मात्र २०१९ सालामध्ये आई झाल्याने अभिनेत्री प्रिया आहुजाने मालिकेतून ब्रेक घेतला होता. मात्र आता ती शोमध्ये पुन्हा आली आहे.
प्रियाचे पती मालव राजदा ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या शोचे दिग्दर्शक आहेत. प्रिया पती मालव राजदासोबत अनेक व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. सोशल मीडिया ती सक्रिय असून अनेक मातांसाठी टीप्स शेअर करत असते.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on September 7, 2021 5:12 pm

