News Flash

‘ज्याच्यासोबत घडते, तोच समजू शकतो’, ‘गोगी’ने वाहिली टप्पूच्या वडिलांना श्रद्धांजली

भव्यच्या वडिलांचे मंगळवारी रात्री निधन झाले.

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मध्ये टप्पूची भूमिका साकारणारा अभिनेता भव्य गांधीच्या वडिलांचे निधन झाले. ११ मे रोजी भव्यच्या वडिलांचा करोनामुळे मृत्यू झाला. आता मालिकेत गोगीची भूमिका साकारणारा अभिनेता समय शाहने भव्यच्या वडिलांना सोशल मीडिया पोस्टद्वारे श्रद्धांजली वाहिली आहे.

भव्य आणि समय हे चुलत भाऊ आहेत. समयने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीला भव्यचे वडील विनोद गांधी यांच्यासोबतचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत त्यांने भावनिक पोस्ट लिहिली आहे.

आणखी वाचा : ‘ये रिश्ता क्या कहलाता है’मधील अभिनेत्रीच्या वडिलांचे निधन, शेअर केली भावुक पोस्ट

आणखी वाचा : ‘तारक मेहता…’मधील ‘टप्पू’च्या वडिलांचे निधन

‘ज्याच्यासोबत घडते, तोच समजू शकतो. इतरांना केवळ दिखाव्याचा खेळ करता येतो, लांब राहून केवळ बोलता येते. पण प्रत्यक्षात ज्याच्यासोबत हे घडते त्यालाच आपल्या जवळच्या व्यक्तीला गमावण्याचे दु:ख असते. अंधारात रडत बसून ती व्यक्ती स्वत:ला विचारत असते हे माझ्यासोबतच का घडले?’ या आशयाची पोस्ट समयने केली आहे.

भव्यच्या वडिलांची करोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना मुंबईमधील कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गेल्या १० दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. मंगळवारी रात्री त्यांनी अखेरचा श्वास घेतला. विनोद गांधी यांच्या पश्चात त्यांची पत्नी यशोदा आणि दोन मुले निश्चित आणि भव्य असा परिवार आहे. भव्यला दोन दिवसांपूर्वी चुलत भाऊ समय शाहच्या बहिणीच्या लग्नाला हजेरी लावायची होती. पण वडिलांची प्रकृती खालावल्यामुळे त्याने या लग्नसोहळ्याला व्हर्चुअल पद्धतीने हजेरी लावली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 13, 2021 1:15 pm

Web Title: taarak mehta ka ooltah chashma gogi samay shah emotional post after tappu bhavya gandhi father death avb 95
Next Stories
1 KKK11 : श्नेता तिवारीने फ्लॉंट केले एब्ज ; अर्जुन बिजलानी म्हणाला, कोणत्या च्यवनप्राशची जादू आहे ?
2 सुरेश रैना पाठोपाठ भज्जीच्या मदतीला धावून आला सोनू सूद, म्हणाला…
3 करण जोहरच्या प्रतिस्पर्धी निर्मात्यासोबत कार्तिक आर्यन करणार काम?
Just Now!
X