News Flash

‘तारक मेहता..’च्या ‘गोगी’ला गुंडांकडून जीवे मारण्याची धमकी; पाहा CCTV फुटेज

याआधीही दोन वेळा काही गुंडांनी घराजवळ येऊन धमकी दिल्याचा खुलासा त्याने केला.

समय शाह

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या लोकप्रिय मालिकेत गोगीची भूमिका साकारणारा अभिनेता समय शाहला काही गुंडांनी जीवे मारण्याची धमकी दिली. याआधीही दोन वेळा काही गुंडांनी घराजवळ येऊन धमकी दिल्याचा खुलासा त्याने केला. याप्रकरणी बोरीवली पोलीस ठाण्यातत्याने तक्रार दाखल केली असून एक सीसीटीव्ह फुटेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

समयच्या घराजवळ कधी एक गुंड तर कधी गुंडांचा ग्रुप मिळून त्याला शिवीगाळ करायचे आणि त्याला जीवे मारण्याची धमकी द्यायचे. काही दिवसांपूर्वी समय शूटिंगहून घरी परतत असताना त्याला या गुंडांनी रोखलं आणि त्याला शिवीगाळ करू लागले. समयने पोलिसांना फोन केल्यानंतर ते तेथून पळाले. जाताना ‘तुला पाहून घेऊ’ अशी धमकी त्यांनी समयला दिली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Samay Shah Fanclub (@samay.fanclub) on

आणखी वाचा : आईने कशी शिकवण दिली माहिती नाही, बाप म्हणून माफी मागतो- कुमार सानू

धमकी देणारी लोकं कोण आहेत आणि ते असं का करत आहेत, याची काहीच माहिती नसल्याचं समयने स्पष्ट केलं. इमारतीचे काही सीसीटीव्ही फुटेज त्याने पोलिसांना सोपवले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 30, 2020 11:35 am

Web Title: taarak mehta ka ooltah chashmah actor samay shah attacked by goons watch cctv ssv 92
Next Stories
1 आईने कशी शिकवण दिली माहिती नाही, बाप म्हणून माफी मागतो- कुमार सानू
2 कुणाल खेमूने काढून घेतला भन्नाट टॅटू, पाहा ३० तास घालवून काढलेल्या या टॅटूची खासियत
3 अभिनय बेर्डे-मयुरेश पेम देणार लक्ष्मीकांत बेर्डे व दादा कोंडके यांना मानवंदना
Just Now!
X