News Flash

‘तारक मेहता…’मधील ‘टप्पू’च्या वडिलांचे निधन

त्यांचे करोनामुळे निधन झाले आहे.

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेत टिप्पूची भूमिका साकारणारा अभिनेता भव्य गांधीच्या वडिलांचे निधन झाले. विनोद गांधी यांचे करोनामुळे निधन झाले आहे. पिंकविलाने दिलेल्या वृत्तानुसार भव्यच्या वडिलांनी ११ मे रोजी मुंंबईमधील रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.

करोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर भव्यच्या वडिलांना मुंबईमधील कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गेल्या १० दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. काल रात्री त्यांनी अखेरचा श्वास घेतला. विनोद गांधी यांच्या पश्चात त्यांची पत्नी यशोदा आणि दोन मुले निश्चित आणि भव्य असा परिवार आहे. भव्यला दोन दिवसांपूर्वी चुलत भाऊ समय शाहच्या बहिणीच्या लग्नाला हजेरी लावायची होती. पण वडिलांची प्रकृती खालावल्यामुळे त्याने या लग्नसोहळ्याला व्हर्चुअल पद्धतीने हजेरी लावली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Bhavya Gandhi (@bhavyagandhi97)

भव्यने ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेत टिप्पू ही भूमिका जवळपास ९ वर्षे साकारली होती. त्याला या मालिकेने लोकप्रियता मिळवून दिली. पण २०१७मध्ये त्याने मालिका सोडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्याने काही गुजराती चित्रपटांमध्ये काम केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 12, 2021 10:27 am

Web Title: taarak mehta ka ooltah chashmah bhavya gandhi father passed away avb 95
Next Stories
1 लेकीने चित्रपटात बोल्ड सीन दिल्यास संजय कपूरची असेल ‘अशी’ प्रतिक्रिया
2 सलमानने मागितली थिएटर्स मालकांची माफी; म्हणाला, “मला माफ करा….”
3 “ओव्हर अ‍ॅक्टिंग की दुकान..टॅटू काढताना दुखलं नाही का?”; ‘त्या’ फोटोंमुळे अभिनेत्री ट्रोल
Just Now!
X