छोट्या पडद्यावरील सर्वात लोकप्रिय मालिका म्हणजे ‘तारक मेहता का उल्टा चष्मा.’ या मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर काही वेगळीच जादू केली आहे. मालिकेतील कलाकार देखील तितकेच लोकप्रिय आहेत. या मालिकेतील एका कलाकाराने तर बॉलिवूड ब्यूटी क्विन ऐश्वर्या राय बच्चनसोबत एका चित्रपटात काम केले आहे.

ही अभिनेत्री म्हणजे मालिकेत दया बेन हे पात्र साकारणारी दिशा वकानी आहे. तिने ऐश्वर्या राय आणि हृतिक रोशन यांच्या ‘जोधा अकबर’ या चित्रपटात काम केले आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन आशुतोष गोवारीकर यांनी केले आहे. या चित्रपटात दिशाने ऐश्वर्या म्हणजेच चित्रपटातील जोधाच्या मैत्रिणीचे पात्र साकारले होते. तिचे चित्रपटात नाव माधवी आहे. हृतिक आणि ऐश्वर्याच्या लग्नानंतर माधवी ऐश्वर्यासोबत तिच्या सासरी जाते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Disha Vakani (@dishavakanioffcal) on

तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेतील दया बेन आणि जेठालाल या दोघांची जोडी प्रेक्षकांना विशेष आवडत असल्याचे दिसत आहे. दयाबेनच्या बोलण्याची अनोखी स्टाईल आणि अभिनयाने तिने अनेकांच्या मनावर राज्य केले आहे. जवळपास ११ वर्षे ही मालिका प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. सध्या लॉकडाउनमध्ये दिशा मुलीसोबत वेळ घावताना दिसत आहे.