News Flash

‘बच्चन सरांना संसर्ग होऊ शकतो तर…’ जेठालालने पुन्हा शुटिंग सुरु होण्यावर व्यक्त केली भीती

एका मुलाखतीमध्ये त्यांनी हे वक्तव्य केले आहे.

एका मोठ्या ब्रेकनंतर आता पुन्हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’चे चित्रीकरण सुरु झाले आहे. पुन्हा मालिकेचे चित्रीकरण सुरु झाल्यामुळे सर्वजण आनंदी असल्याचे पाहायला मिळते. मालिकेतील जेठालाल हे पात्र साकारणारे दिलीप जोशी यांनी एका मुलाखतमीध्ये बच्चन सरांना करोनाचा संसर्ग होऊ शकतो तर इतर कोणालाही होऊ शकतो असे म्हटले आहे.

नुकताच दिलीप जोशी यांनी मुंबई मिररला मुलाखत दिली. ‘आम्ही मालिकेचा प्रत्येक एपिसोड केवळ चार कलाकारांसोबत शूट करत आहोत. आम्ही क्रू मेंबर्स देखील कमी केले आहेत. कारण सेटवर जास्त लोकांमुळे करोनाचे संक्रमण होण्याची भीती वाटते. जर अमिताभ बच्चन सर यांनी इतकी काळजी घेऊनही त्यांना करोनाचा संसर्ग होऊ शकतो तर इतर कोणालाही करोनाचा संसर्ग होण्याची भीती आहे. खासकरुन कलाकारांचे चित्रीकरण सुरु असताना. कारण ते कॅमेरा समोर मास्क परिधान करु शकत नाहीत’ असे दिलीप यांनी म्हटले आहे.

पाहा : ‘तारक मेहता…’मधील बबिता घेते एका एपिसोडसाठी इतके मानधन

तसेच चित्रीकरणाच्या वेळी थोडी भीती वाटते असे देखील त्यांनी म्हटले आहे. ‘सेटवरचे संपूर्ण वातावरण बदलले आहे. आम्ही ११ जुलैपासून सकाळी ८ वाजल्यापासून ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत चित्रीकरण करत होतो. जवळपास १० तास’ असे त्यांनी पुढे म्हटले आहे.

पाहा : ‘तारक मेहता…’मधील मिसेस हाती एका एपिसोडसाठी घेतात ‘इतके’ मानधान

सध्या ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेचे जुने भाग दाखवले जात आहेत. २२ जुलै पासून मालिकेचे नवे भाग दाखवण्यात येणार आहेत. त्यासाठी मालिकेचा एक प्रमो देखील रिलिज करण्यात आला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 17, 2020 10:34 am

Web Title: taarak mehta ka ooltah chashmah dilip joshi aka jethalal opens up about shooting amid covid avb 95
Next Stories
1 एकता कपूरने सुशांतच्या आठवणीमध्ये लाँच केला ‘पवित्र रिश्ता फंड’
2 मुलीचा बारावीचा निकाल पाहून शरद पोंक्षे भावूक, म्हणाले “माझ्यावर कर्करोगाचे उपचार सुरू असताना तिने..”
3 Video : ‘चल थोडा डान्स करे’; संजनाने शेअर केल्या सुशांतसोबतच्या कटूगोड आठवणी
Just Now!
X